आमदार रोहित पवार भूलभुलैया करण्यात पटाईत – न केलेल्या कामाचे श्रेय घेतात – प्रा. राम शिंदे

0
213
जामखेड न्युज – – – – 
 गेल्या दोन वर्षांपासूनच्या काळात कर्जत जामखेड मध्ये
शेतकऱ्यांना विजेची मोठी कसरत करावी लागत आहे.
कुठलीही भरपाई नाही, मात्र न केलेल्या योजनांच्या
कामाचे श्रेय आमदार घेतात मतदारसंघात फक्त भूलभुलैया सुरू आहे. हे कुठे तरी थांबले पाहिजे असा टोला माजी मंत्री प्रा राम शिंदे यांनी आमदार रोहित पवार यांना लावला.
माजी मंत्री तथा प्रदेश उपाध्यक्ष प्रा. राम शिंदे यांच्या
जनसंपर्क कार्यालयाचे उदघाटन भाजपचे जेष्ठ नेते
हिरालाल गुंदेचा यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी प्रा.
राम शिंदे यांची महाराष्ट्राच्या कोअर कमिटी सदस्य पदी
निवड झाल्या बद्दल जामखेड भाजपच्या वतीने त्यांचा
सन्मान करण्यात आला यावेळी ते बोलत होते.
या वेळी माजी सभापती डॉ भगवान दादा मुरूमकर,
तालुका अध्यक्ष अजय काशिद, युवा मोर्चा ता.अध्यक्ष
पै. शरद दादा कार्ले, उपसभापती रवि सुरवसे, जि.प.सदस्य अनिल लोखंडे, सभापती गौतम उतेकर ,संचालक पोपट राळेभात, करण ढवळे, मकरंद काशिद ,सरपंच लहु शिंदे, बापुराव ढवळे, बबन काशिद नगरसेवक अमितशेठ चिंतामणी, सोमनाथ राळेभात, डॉ. ज्ञानेश्वर झेंडे, मनोज राजगुरू, नगरसेवक गणेश आजबे, मनोज कुलकर्णी, अँड. बंकटबारवकर,अँड.प्रवीण सानप, अभिजित राळेभात, कैलास महाराज नेटके, शहर अध्यक्ष बिभिषण धनवडे,
डॉ.अल्ताफ शेख, संजय राऊत, डॉ.गणेश जगताप, डॉ.विठ्ठल राळेभात, उदय पवार, उपाध्यक्ष मोहन गडदे ,संपत राळेभात, सलीम तांबोळी, बाजीराव गोपाळघरे श्रीराम डोळे, प्रवीण बोलभट,अण्णासाहेब ढवळे, अर्जुन म्हेत्रे, महारुद्र महारनवर ,सरपंच गणेश लटके, निलेश वाघ, प्रसिद्धी प्रमुख उध्दव हुलगुंडे आदी पदाधिकारी व कार्यकर्ते
उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा राम शिंदे म्हणाले की जलजीवन
योजनेचे भुमीपुजन आमदारांच्या आईच्या हस्ते करतात
हे कुठल्या नियमात बसते. हे पवार घराण्याला
राजशिष्टाचार कळत नाही का असा सवाल शिंदे यांनी
उपस्थित केला. जामखेड तालुक्यातील नागरीकांचे प्रश्न
सोडविण्यासाठी व संपर्कात राहण्याठी तसेच कार्यकर्ते
व पदाधिकारी यांच्या अडचणी सोडवण्यासाठी संपर्क
कार्यालय सुरू केले आहे. गेलेले गतवैभव परत
आणण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here