जामखेड न्युज – – – –
कर्जत तालुक्यातील माहिजळगाव शिवारातील जमिनीची भूमिअभिलेख कार्यालयाकडून केलेल्या मोजणीनुसार तिन्ही खातेदारांचे पोटहिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी २० हजारांची लाच घेताना येथील भूमिअभिलेख कार्यालयातील सुनील झिप्रू नागरे ( वय ४८ ) , वसंत कमलाकर ( वय ५२ , भूकरमापक , वर्ग -३ , दोघेही नेमणूक भूमिअभिलेख कार्यालय , कर्जत ) या दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागा नगरच्या पथकाने रंगेहाथ पकडले.
कर्जत तालुक्यातील आंबीजळगाव येथील तक्रारदार यांची पत्नी व इतर दोघांच्या नावे माहिजळगाव शिवारात असलेल्या जमिनीची मोजणी येथील भूमिअभिलेख कार्यालयाकडून झाली होती. मात्र मोजणीनुसार तिन्ही खातेदारांचे पोटहिस्से करून हद्दीच्या खुणा दर्शविण्यासाठी वरील दोघांनी तक्रारदारास २५ हजारांची लाच मागितली. तडजोडीअंती २० हजारांची लाच देण्याचे मान्य झाले. या नुसार कार्यालयात आरोपीने पंचांसमक्ष त्यानुसार येथील भूमिअभिलेख तक्रारदाराकडून वीस हजारांची रक्कम स्वीकारली तेव्हा दोघांना परिक्षेत्राच्या लाचलुचपत प्रतिबंधक पकडण्यात आले.
ही कारवाई नाशिक विभागाच्या पोलिस अधीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली पर्यवेक्षण अधिकारी हरीश खेडकर, पोलिस निरीक्षक शरद गोर्डे, रमेश चौधरी, वैभव पांढरे, रवींद्र पथकाने ही कामगिरी केली . निमसे , हरून शेख , राहुल डोळसे या









