Friday, February 13, 2026
Home ताज्या बातम्या सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य भूषणावह – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचे कार्य भूषणावह – गटविकास अधिकारी प्रकाश पोळ

0
243
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – – – 
दहाजण जे काम करू शकत नाहीत असे काम सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी हे करत असतात. हे जामखेडकरांसाठी अभिमानाची आणि भूषणावह बाब असल्याचे गौरोदगार पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांनी काढले.
 सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांचा वाढदिवस विविध मान्यवरांच्या हस्ते तसेच विविध संघटनांच्या माध्यमातून गुरूवारी (३ मार्च ) साजरा करण्यात आला .यावेळी पोळ बोलत होते. कोठारी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .यावेळी  वैद्यकीय अधिकारी डॉ. युवराज खराडे , खटोड प्रतिष्ठान सुशील खटोड ,शिवप्रतिष्ठान हिंदुस्तानचे अध्यक्ष पांडू राजे भोसले , डॉ. भास्कर जाधव, वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ,डॉ. भरत दारकुंडे ,कॅप्टन लक्ष्मण भोरे ,प्रवीण छाजेड ,एम जी एस कंपनीचे सचिन गाडे, प्रफुल्ल सोळंकी ,अमोल तातेड ,गणेश भळगट ,संजय गांधी, पत्रकार मिठूलाल नवलाखा, संतराम सूळ, अविनाश बोधले, सुदाम वराट,पप्पूभाई सय्यद,गणेश देवकाते, ॲड. हर्षल डोके, सुनील जगताप, श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी ,राहुल बेदमुथा, तुषार बेदमुथा ,विनोद नवले संजय बोरा, अभय बोरा, विनोद बोरा, संजय गुंदेचा, विनोद बेदमुथा, प्रशांत बोरा, सुनील चोरडिया ,संदीप भंडारी ,मनोज भंडारी ,  सुभाष बाफना, बबनशेट अंबड बीड,अनिल फिरोदिया ,सचिन देशमुख ,महेश कुमटकर, गोविंद जायभाय, पैलवान हर्षद शिंदे,आनंद नहार,मयूर अंदुरे,
मनोज कुलथे उमेश भोगे, निलेश तवटे विजय अष्टेकर ,राहुल उगले , धनंजय कारले, दिपक भोरे, सतीश बोरा, अमित गंभीर, धनराज पवार ,प्रदीप राऊत, संतोष गर्जे, योगेश भंडारी ,महेश कटारिया , सुनील पितळे, प्रमोद गांधी उपस्थित होते.
 गटविकास अधिकारी पोळ म्हणाले ,अपघातातील रुग्णांना मदत करण एव्हढेच नाही.तर कोरोना  काळामध्ये भटक्या कुत्र्यांना त्यांनी भाकरी देवून एक आगळा-वेगळा उपक्रम राबवला. कारण यावेळी माणसाला खाण्याची सोय होती.मात्र भटक्या कुत्र्याकडे कोण पाहणार . हा विचार मनात येऊन दोन महिने कुत्र्यांना चपात्या तर भटक्या जनावरांना हिरवा चारा दिला,  कोरोना रुग्णांच्या अंत्यविधी अथवा रस्त्याने गावाकडे जात असलेल्या लोकांना भोजनाची व्यवस्था केली. खरोखर खूप मोठे कार्य संजय कोठारी करतात यांच्या कार्याची कोणीही  बरोबरी करू शकत नाही. मी तीन महिन्यापूर्वी जामखेडला पदावर हजर झालो तेव्हा  सामाजिक कार्यकर्ते कोठारी यांच्या कार्याबद्दल खूप एकले.
  यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ युवराज खराडे म्हणाले,   बारा वर्ष जामखेडमध्ये वैद्यकीय अधीक्षक म्हणून सरकारी दवाखान्यांमध्ये कार्यरत असताना संजय कोठारी यांनी रात्री-बेरात्री अपघातातील लोकांना आणून त्यांच्यावर उपचार करून घेतलेले आहेत. अपघातातील परप्रांतातील लोकांचा मृत्यू झाला तर  पोलिस पंचनामा पोस्टमार्टम रिपोर्ट , मृत्यू दाखला या सर्व गोष्टी स्वतः तयार करून घेत सर्वोतपरी मदत करत. त्यांच्यामुळे मला पण काम करण्याची स्फूर्ती मिळाली आहे.
     यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान चे अध्यक्ष पांडूराजे भोसले म्हणाले, संजय कोठारी यांचा कार्य मी लहानपणापासून पाहत आहे. ते स्वतः अपघातातील लोकांना मदत करतात ही फार मोठी गोष्ट आहे. त्यांनी मला प्रत्येक कामात मदत केलेली आहे.
या कार्यक्रमात  संत ज्ञानेश्वर माऊली वृद्धाश्रमातील वृद्धांना मिठाई देण्यात आली तसेच नवज्योत प्रकल्प जामखेड येथील अनाथ मुलांना वह वृध्दांना मिठाई वाटप करण्यात आली तसेच साकेश्वर गौशाळा शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान संचलित गायांना हिरवा चारा देण्यात आला
 खटोड प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुशील खटोड , श्रावक संघाचे अध्यक्ष कांतीलाल कोठारी, गहीनाथ लोखंडे महाराज, सचिन देशमुख, प्रफुल सोळंकी यांनी कोठारी यांच्या कार्याचा गौरव केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!