Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या तेजस कोठारी यांची जैन कॉन्फरन्सच्या युवक विभागाच्या मार्गदर्शकपदी निवड

तेजस कोठारी यांची जैन कॉन्फरन्सच्या युवक विभागाच्या मार्गदर्शकपदी निवड

0
208

जामखेड न्युज – – – – 

            
येथील युवा कार्यकर्ते तेजस कोठारी जैन यांची स्थानकवासी जैन समाजाची मातृ संस्था श्री ऑल इंडिया श्र्वेतांबर स्थानकवासि जैन कॉन्फरन्स दिल्ली च्या महाराष्ट्र राज्य कार्यकारणी मधील युवक विभागाच्या प्रमुख मार्गदर्शक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

ही संस्था 120 वर्षा पासून देशात सामाजिक , धार्मिक उपक्रम राबवित असून तेजस कोठारी गत 8 वर्षापासून संस्थेमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत. तालुकाध्यक्ष , प्रांतीय मंत्री , प्रांतीय महामंत्री , योजनेचे प्रांतीय कार्याध्यक्ष आदी सह विविध पदांवर काम केले आहे. त्यांच्या कार्यक्षमतेचा पाहूनच ही महत्वाची जबाबदारी कोठारी यांना दिली असल्याचे प्रांतीय युवाध्यक्ष रोशन चोरडिया यांनी सांगितले.

अहमदनगर मध्ये झालेल्या भव्य पद ग्रहण सोहळ्यात कोठारी यांना संस्थेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष पारस मोदी जैन यांच्या द्वारे पदाची शपथ देण्यात आली तर राष्ट्रीय उपाध्यक्ष शाशिकुमार कर्णावट यांच्या हस्ते नियुक्ती पात्र देवून सन्मानित करण्यात आले .

यावेळी जैन समाजातील गरजूंना मोठ्या प्रमाणात मदत मिळून देण्या साठी , संस्था गावा गावात पोहोचवून संघटने साठी आणि साधू संतांच्या सेवे साठी पदाचा योग्य वापर करणार असल्याची ग्वाही कोठारी यांनी माध्यमांना दिली.

या वेळी माजी अध्यक्ष अविनाश चोरडिया , उद्योगपति प्रकाश धाडीवाल , सामाजिक कार्यकर्ता संजय कोठारी , माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी , मनोज शेटिया, बाबुसेठ लोढा , विलास लोढा , सुशील खटोड , सतीश चोपडा , निखिल संचेती , बाबुसेठ बोरा , मनोज भाटेवरा , सागर साखला, नितीन चोपडा , चंद्रकांत चोरडिया , पवन कटारिया , धनेश कोठारी आदी सह मोठ्या प्रमाणात पदाधिकारी , सभासद , मित्र परिवार उपस्थित होता. कोठारी यांच्या निवडीने सर्वत्र स्वागत होत असून राज्यातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!