Saturday, February 14, 2026
Home ताज्या बातम्या पोस्टरमुळे मोजक्या शब्दात आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो – शशिकांत देशमुख

पोस्टरमुळे मोजक्या शब्दात आशय प्रेक्षकांपर्यंत पोहोचतो – शशिकांत देशमुख

0
250
जामखेड न्युज – – – – – 
पोस्टर हे मोजक्या शब्दात चित्र व आलेख यांच्या सहाय्याने योग्य तो आशय प्रेक्षकांपर्यंत पोचविणारे एक प्रभावी साधन
आहे असे मत दि पिपल्स एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी शशिकांत देशमुख यांनी व्यक्त केले.
 जामखेड महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या पोस्टर प्रदर्शन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे उपाध्यक्ष अरुणशेठ चिंतामणी हे होते. यावेळी प्राचार्य डॉ. सुनील नरके व इतर सर्व प्राध्यापक हजर होते
देशमुख पुढे म्हणाले, चित्रकला व रंगसंगती यांचा
आविष्कार, संवादी भाषा आणि संबंधित विषयातील
नेमकी व अचूक माहिती यांचा संगम पोस्टर मध्ये व्हावा
लागतो.
     महाविद्यालयात विविध स्पर्धांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कलागुण व कल्पनाशक्तीचा विकास करण्याचा नेहमीच प्रयत्न करण्यात येत असल्याचे प्राचार्य सुनील नरके यांनी यावेळी बोलताना सांगितले.
     राष्ट्रीय विज्ञान दिन साजरा करण्यामागील भूमिका व महत्त्व प्रा. संजय गाडेकर यांनी आपल्या प्रास्ताविकात विषद केले.
    पोस्टर स्पर्धेमध्ये मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता.या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी केले, तर आभार प्रा. शाम गोलेकर यांनी मानले. प्रा. तुकाराम घोगरदरे यांनी सूत्रसंचालन केले.
     सदर स्पर्धा यशस्वी पार पाडण्यासाठी सर्वच प्राध्यापकांनी मेहनत घेतली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!