समृद्धी महामार्गांमुळे एका शेतकर्‍याने घेतल्या शंभर बोलेरो मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले अनेक किस्से

0
234
जामखेड न्युज – – – 
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला, तर कोणी चक्क हॉटेलचेही समृद्धी नामकरण केले. एका गावात तर शेतकऱ्यांनी चक्क 100 बोलेरो जीप घेतल्या.असे किस्से राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.
 महा कॉन्क्लेव्हचं उद्घाटन राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्या हस्ते झाले. यावेळी राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई (subhash desai) देखील उपस्थित होते.
राज्याच्या दृष्टीने अतिशय महत्वकांक्षी असणारा नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग येत्या वर्षभरात सुरू होईल. त्यामुळे शेतकऱ्यांच्या हातात पैसा खुळखुळला असून, अनेकांच्या घरात समृद्धी आली. त्यामुळे कोणी घराला, तर कोणी चक्क हॉटेलचेही समृद्धी नामकरण केले. असे किस्से राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी सांगितले.
समृद्धी प्रकल्पाची माहिती देताना मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, या प्रकल्पांतर्गत चक्क एक नव्हे तर 20 नवनगरे वसवली जात आहेत. अनेक ठिकाणी कृषीशी संबंधित केंद्र उभारली जात आहेत. त्यामुळे सध्याच अॅमेझॉन, फ्लिपकार्टसारख्या कंपन्या ग्रामीण भागाकडे निघाल्यात.
मंत्री शिंदे म्हणाले की, आम्ही समृद्धी प्रकल्पासाठी जवळपास हजारो एकर जमिनीचे संपादन केली. ती शेतकऱ्यांकडून खरेदी केली. त्याचा योग्य तो मोबदला त्यांना दिला. अनेक शेतकरी जमिनी द्यायला पुढे येत नव्हते. एका ठिकाणी मी गेलो.
माझ्या उपस्थितीत हा व्यवहार झाला आणि दोन तासांत शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वर्ग झाले. त्यामुळे इतर शेतकरीही पुढे आले. त्यांनी जमिनी दिल्या. या प्रकल्पातून अनेकांच्या जीवनात परिवर्तन आले. एका गावात तर शेतकऱ्यांनी चक्क 100 बोलेरो जीप घेतल्या.
समृद्धी महामार्ग 701 किमी लांबी आहे. तो 10 जिल्हे, 26 तालुके व आसपासच्या 392 गावांना जोडतो. याची गती मर्यादा 150 किमी आहे. त्यामुळे नागपूर व मुंबई हे अंतर 8 तासांत कापले जाईल. मुंबई ते औरंगाबाद प्रवासाचा कालावधी 4 तास आणि औरंगाबाद ते नागपूर 4 तास वेळ लागेल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here