जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
आमदार रोहित पवार हे जनतेत जाऊन त्यांच्या अडचणी जाणून घेण्यात आघाडीवर असतात कधी कुभांराच्या आव्यावर जाऊन मडके बोळके बनवतात तर कधी सामान्य कार्यकर्त्यांच्या दुकानात जाऊन अडीअडचणी जाणून घेतात आज जामखेड तालुक्यातील महारुळी येथे आसताना शेतात ज्वारी काढण्याचे काम सुरू होते आमदार रोहित पवारांनी लगेच शेतात जाऊन ज्वारी काढली यामुळे संबंधित शेतकरी आश्चर्यचकित झाले. सध्या सोशल मीडियावर भलरी म्हणत ज्वारी काढण्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला आहे.
आमदार रोहित पवारांच्या हस्ते आज कर्जत-जामखेड मधील निंबोडी, वंजारवाडी, फक्राबाद, डिसलेवाडी, खांडवी, झिक्री, राजेवाडी, गुरेवाडी, महारुळी, पोतेवाडी, चोभेवाडी, आघी या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी दुपारी महारुळ या ठिकाणी असताना शेजारी ज्वारी काढणी सुरू होती आमदार रोहित पवारांनी लगेच शेतात जाऊन प्रत्यक्ष कार्यकर्त्यांसह भलरी म्हणत ज्वारी काढण्याचा अनुभव घेतला








