जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
वैद्यकीय तंत्रज्ञान प्रगत झाले असले तरीही रक्ताला पर्याय नाही. रक्ताचा प्रश्न सतत भेडसावत असतो. रुग्णांना रक्ताची गरज असली की कुटुंबीय सैरभैर होतात. रक्ताचा तुटवडा पडला की जीवन-मरणाच्या रेषेवर झुंजत राहतात. रक्तदान करण्यासाठी गरज पडल्यास अनेकजण धावून येतात रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे असे मत शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी यांनी सांगितले.
जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्त
भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख राजेंद्र दळवी, तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड, कृषी अधिकारी राजेंद्र सुपेकर, शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, शहरप्रमुख गणेश काळे, उपप्रमुख अवि बेलेकर, डॉ. प्रताप चौरे, नगरसेवक बिभिषण धनवडे, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रा. लक्ष्मण ढेपे, संजय बेलेकर, शिक्षक नेते नारायण राऊत, डॉ. अविनाश पवार, प्रहार तालुकाध्यक्ष जयसिंग उगले, चंदन अंधारे, सागर गुंदेचा, सुरज काळे, चंद्रकांत गोरे, दिपक सुरसे, प्रा. युवराज भोसले, ज्ञानेश्वर कोळेकर, लहू शिंदे, विजय काशिद, पप्पू काशिद, आण्णा काशिद, श्यामभाऊ शिंदे, मोहनभाऊ ढाळे, कृषी अधिकारी नितीन शिंदे, पांडुरंग क्षीरसागर, किरण मुळे, नाना रासकर, गणेश राळेभात, दत्ता काळे, संतोष घोलप, अशोक शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
दिवसभर रक्तदान शिबीरात अनेक युवकांनी रक्तदान केले
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन सुत्रसंचलन संतोष मोहळकर यांनी केले