जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेडमध्ये प्रथमच महिला अनोख्या पद्धतीने शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे कार्यक्रमाचे आयोजक रोहिणी संजय काशिद असणार आहेत. या कार्यक्रमासाठी सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद यांचे खास आकर्षण राहणार आहे. तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार असणार आहेत.
रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त तालुका महिला आघाडी व रोहिणी संजय काशिद आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. दुपारी तीन वाजता छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती पासून महिलांची भगवे फेटे परिधान करून डोळ्याचे पारणे फेडणारी भव्य रॅली निघणार आहे या रॅलीत मुलींचे शस्त्रपथक, मुलींचा रोप मल्लखांब, शिवथिम नृत्य व पोवाडे सादरीकरण केले जाणार आहेत. संविधान चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून महाप्रसाद कार्यक्रम होईल अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी संजय काशिद यांनी दिली.
या कार्यक्रमासाठी खास आकर्षण म्हणून सिनेतारका व शिवसेना नेत्या दिपाली भोसले सय्यद उपस्थित राहणार आहेत. तर अध्यक्षस्थानी बारामती अॅग्रोच्या विश्वस्त सुनंदाताई पवार राहणार आहेत.