अनोखी लग्नपत्रिका – मोदी सरकारच्या निषेधाची अनोखी पद्धत लग्नपत्रिकेत

0
272
जामखेड न्युज – – – – 
 लग्न पत्रिका म्हटलं की ती कशी सुंदर आणि भारदार हवी असं प्रत्येक विवाह करणाऱ्याचं स्वप्न असतं. आपलं लग्न खास आणि विस्मरणीय बनावं यासाठी अनेकजण वेगवेगळ्या प्रकारचे अनोखे मार्गही अवलंबतात. काही लोकांच्या लग्नपत्रिकेत एक अनोखा संदेश लिहिलेला दिसतो, तर काही लोकं लग्नपत्रिका खूप सजवतात. पण एका तरुणानं चक्क आपल्या लग्नपत्रिकेत मोदी सरकारचा निषेध करण्याची अनोखी पद्धत निवडली.
लग्नासाठी छापल्या 1500 पत्रिका
हरियाणातील एका तरुण शेतकऱ्याचं लग्न ठरलं आणि त्यानं आपल्या लग्नात पाहुणे तसेच मित्र मंडळीला आमंत्रण देण्यासाठी 1500 पत्रिका छापल्या. या पत्रिकांमध्ये त्यानं केंद्र सरकारचा निषेध करण्याची अनोखी पद्धत निवडली. ज्यामध्ये तरुणाने पीक उत्पादनावर किमान आधारभूत किंमत (एमएसपी) हमी देणारा कायदा करण्याची मागणी केली. शेतकरी आंदोलनाची थीम घेऊन तरुणाने ही लग्नपत्रिका छापल्याने ती सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
लढाई अजूनही सुरूच’
मोदी सरकारने शेतकऱ्यांसाठी आणलेले तीन कृषी कायदे अचानक मागे घेतले. त्यानंतर या कृषी कायद्यांविरुद्ध दिल्लीच्या सीमांवर सुरू असलेले शेतकरी आंदोलन थांबले. या गोष्टीला एका महिन्याहून अधिक कालावधील लोटला आहे. मात्र तरी देखील या तरुण शेतकऱ्याने आपली लढाई सुरूच ठेवली. ‘लढाई अजूनही चालू आहे, एमएसपीची बारी’ असे त्याने लग्नपत्रिकेत लिहलं आहे. याशिवाय लग्नपत्रिकेवर ‘ट्रॅक्टर’ आणि ‘नो फार्मर्स, नो फूड’ असा फलकही लावण्यात आला आहे.
‘तेव्हाच शेतकऱ्यांचा विजय होईल’
दरम्यान या लग्नपत्रिकेबाबत नवरदेव प्रदीपला विचारले असता, तो म्हणाला की, ‘शेतकऱ्यांच्या आंदोलनाचा विजय अद्याप पूर्ण झालेला नाही, असा संदेश मला माझ्या लग्नपत्रिकेतून द्यायचा आहे. म्हणून मी हे केलं. खरेतर जेव्हा केंद्र सरकार शेतकऱ्यांना हमीभाव देणारा एमएसपीबाबत लेखी पद्धतीने कायदा तयार करेल, तेव्हाच शेतकऱ्यांचा विजय घोषित होईल आणि तेव्हाच शेतकर्‍यांचे हौतात्म्य आणि त्यांचे बलिदानही पूर्ण होईल.’
‘हमी देणारा कायदा फक्त तोंडीच’
खरं तर, मोदी सरकारने जेव्हा तीन कृषी कायदे मागे घेतले तेव्हा शेतकरी आणि सरकारमध्ये एक करार झाला होता.
ज्यामध्ये सरकारकडून शेतकऱ्यांना एमएसपी म्हणजेच शेतमालाला हमी भाव देण्याबाबत कायदा केला जाईल अशी हमी देण्यात आली होती. परंतु हा कायदा अद्यात लेखी स्वरुपात सरकारकडून मांडण्यात आलेला नाही. ज्यांमुळे या नवरदेवाने आपल्या पत्रिकेच्या माध्यमातून निषेध दर्शवला, ज्यामुळे ही पत्रिका लोकांमध्ये चर्चेत आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here