जामखेडमधील महिला करणार अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा सादर तर शिवसेनेचे वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन

0
201
जामखेड प्रतिनिधी 
              जामखेड न्युज – – – – 
जाणता राजा संपूर्ण देशाचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त जामखेड तालुका महिला आघाडीच्या अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे तर जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे.
रयतेचा राजा शिवछत्रपती यांच्या जयंतीनिमित्त तालुका महिला आघाडी व रोहिणी संजय काशिद आयोजित भव्य शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज बाजार समिती पासून महिलांची भगवे फेटे परिधान करून डोळ्याचे पारणे फेडणारी
 भव्य रॅली निघणार आहे या रॅलीत मुलींचे शस्त्रपथक, मुलींचा रोप मल्लखांब, शिवथिम नृत्य व पोवाडे सादरीकरण केले जाणार आहेत. संविधान चौकात शिवजन्मोत्सव सोहळा साजरा करून महाप्रसाद कार्यक्रम होईल अशी माहिती जामखेड न्युजशी बोलताना महिला आघाडीच्या प्रमुख रोहिणी संजय काशिद यांनी दिली.
     जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने शिवजयंती निमित्ताने दरवर्षी वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन केले जाते त्या कार्यक्रमात सर्वात महत्त्वाचे म्हणजे जे लोकांचे जीव वाचू शकतात जगात सर्व प्रकारच्या कारखाने आहेत आणि सर्व प्रकारच्या वस्तू त्या कारखान्यात बनवल्या जातात पण ब्लड अशी वस्तू आहे की ज्याचा कारखाना नाही. ती एका व्यक्तीकडून दुसर्‍या व्यक्तीला दिले जाते म्हणूनच रक्तदान हे सर्वात श्रेष्ठदान जगाने मान्य केलेआहे आणि शिवजयंती निमित्त जर महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जर अभिवादन करायचे असेल तर आपण समाजाचे देणे लागतो म्हणून सर्व शिवभक्तांना शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद यांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करून दुसऱ्याचे जीवन वाचवावे असे आवाहन केले आहे.
   अशा प्रकारे जामखेड तालुका महिला आघाडी वतीने अनोखा शिवजन्मोत्सव सोहळा तर शिवसेनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबीराचे आयोजन करून आपले सर्वांचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना जयंतीनिमित्त अभिवादन करण्यात येणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here