जामखेड न्युज – – – –
बुलढाणा जिल्ह्यात एक ध्क्कादायक प्रकार समोर आला आहे. येथील एका व्यापाऱ्याने केंद्र सरकारच्या तिजोरीवरच तब्बल १०० कोटी रुपयांचा डल्ला मारलाय. या व्यापाऱ्याने जीएसटीच्या रुपातील कराचे तब्बल १०० कोटी रुपये बुडवल्याचा दावा अधिकाऱ्यांनी केलाय. हा प्रकार खामगाव येथील जीएसटी कर सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी उघडकीस आणला आहे.
करचोरीचं हे प्रकरण कुणाच्या लक्षात येऊ नये म्हणून नितीन टावरी नावाच्या या व्यापाऱ्याने बनावट दस्तऐवज तयार करून अधिकाऱ्यांच्या सह्या आणि शिक्के सुद्धा बनावट वापरल्याचे अधिकाऱ्यांच्या लक्षात आले आहे. त्यामुळे नितीन टावरी या व्यापाऱ्याविरुद्ध पोलिसात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
त्यामुळे या देवकी अॅग्रो इंडस्ट्रीच्या नितीन टावरींविरुद्ध तक्रार देत विविध गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. अशाचप्रकारे नितीन टावरी यांच्या मालकीच्या एकूण सहा कंपन्या आहेत. या कंपन्यांचे ऑडिट केल्यानंतर तब्बल १०० कोटी रुपयांच्या जीएसटी कर बुडवल्याचं समोर येईल असा दावा जीएसटी सहायक आयुक्त चेतनसिंग राजपूत यांनी केलाय.