२७ गावातील पोलीस पाटलांच्या रिक्त जागा भरा – अँड, डॉ. अरुण जाधव

0
210
जामखेड न्युज – – – 
जामखेड तालुक्यातील २७ गावांना पोलीस पाटलांशिवाय कायदा-सुव्यवस्था राखावी लागत आहे. रिक्त पदासाठी शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया करावी यासाठी वंचित बहुजन आघाडी जामखेड यांच्या वतीने नायब तहसीलदार मनोज भोसेकर यांना निवेदन देण्यात आले. प्रशासन आणि गाव यांच्यातील महत्वाचा दुवा समजल्या जाणाऱ्या पोलीस पाटील या पदावर मोठी जबाबदारी असते. मात्र मागील तेरा वर्षापासून जामखेड तालुक्यातील तब्बल २७ गावांचे पोलीस पाटील यांचे पद रिक्त आहे. विशेष बाब म्हणजे बिंदुनामावली तयार नसल्याने पोलीस पाटील प्रक्रिया ठप्प पडली आहे.
 पर्यायाने या गावातील कायदा-सुव्यवस्था वाऱ्यावर आहे. कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास गावपातळीवर महसूल आणि प्रशासन या दोन्ही विभागांसाठी पोलीस पाटील महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. गाव पातळीवर पोलीस पाटील या पदाला फार महत्त्व असते कोणत्याही घटना, घडामोडी शासनाला पोलीस पाटलान मार्फत पुरविली जाते. गावात अनैसर्गिक संशयास्पद मृत्यू घडल्यास याची माहिती पोलीस पाटलांना द्यावी लागते. सार्वजनिक शांततेचा भंग करणारी माहिती गोळा करून ती पोलिसांना पुरवण्याचे काम करावे लागते. जबाबदारी असणाऱ्या पोलीस पाटलांचे पद रिक्त असणे म्हणजे गंभीर बाब आहे. २७ गावांना पोलीस पाटलांन शिवाय कायदा-सुव्यवस्था राखावी लागत आहे. या रिक्त पदासाठी शासनाने लवकरात लवकर भरती प्रक्रिया करावी म्हणून वंचित बहुजन आघाडी च्या वतीने नायब तहसीलदार भोसेकर साहेब यांना निवेदन देण्यात आले. व अशी माहिती शहराध्यक्ष अजिनाथ शिंदे यांनी दिली. यावेळी उपस्थित अँड डॉ मा. अरुण जाधव ( भटके-विमुक्त राज्य समन्वयक) मा. बापू ओहोळ (प्रवक्ते लोकाधिकार आंदोलन) मा. अतिश पारवे ( तालुका अध्यक्ष) मा. अजिनाथ शिंदे ( शहर अध्यक्ष) मा. किशोर मोहिते ( तालुका उपाध्यक्ष) मा. सुरेश जाधव (मा. उपसरपंच)  विशाल पवार(तालुकाध्यक्ष लोकाधिकार आंदोलन) दोरकाताई पवार, गणपत कराळे वैजनाथ केसकर, मच्छिंद्र जाधव, अंकुश पवार, संतोष चव्हाण, बाळासाहेब लोखंडे, अतुल ढवणे, भीमराव सुरवसे,लाला वाळके, राजू शिंदे, रोहित पवार व इतर कार्यकर्ते उपस्थित होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here