नायगावच्या सबस्टेशनमुळे शेतकर्‍यांना चांगल्या दाबाने वीजपुरवठा होईल – आमदार रोहित पवार

0
231

जामखेड प्रतिनिधी

              जामखेड न्युज – – – – –
 शेतकर्‍यांना वीजेच्या बाबतीत मोठ्या प्रमाणावर अडचणीचा सामना करावा लागत होता. कमी दाबाने वीजपुरवठा होत होता याचा विचार करून नायगाव येथे राज्यसरकारने नायगाव येथे सबस्टेशन मंजूर केले आहे. यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या दाबाने वीजपुरवठा होईल असे आमदार रोहित पवारांनी सांगितले.
        आज जामखेड तालुक्यातील राजुरी, नायगाव, शिऊर, देवदैठण, सावरगाव, मोहा या ठिकाणी विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण स्थानिक नागरिकांच्या हस्ते करण्यात आले यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी पंचायत समितीचे सभापती सूर्यकांत मोरे, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष दत्तात्रय वारे, कर्जत जामखेड गटप्रमुख प्रा.मधुकर राळेभात, शरद शिंदे, राजेंद्र पवार, सचिन घुमरे, चंद्रकांत गोलेकर यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
     राजुरी सबस्टेशन वर मोठ्या प्रमाणावर लोड होता आता नायगाव येथे सबस्टेशन झाल्याने नायगाव ला पाच गावे व राजुरी दहा गावे जोडण्यात येतील यामुळे शेतकर्‍यांना चांगल्या दाबाने वीजपुरवठा होईल.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here