जामखेड न्युज – – –
आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आज अहमदनगर महानगरपालिकेला (Ahmednagar Municipal Corporation) सदिच्छा भेट देऊन नगर दर्शनाची (Nagar Darshan) आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्याकडे केली इच्छा व्यक्त केली. नगर शहराला ऐतिहासिक (Historical), सांस्कृतिक (Cultural), धार्मिकतेचा (Righteousness) परंपरा लाभलेला आहे.
नगर शहरात (Nagar City) अनेक पुरातन वास्तू मोठ्या दिमाखात उभे आहे. यामध्ये भुईकोट किल्ला (Bhuikot Fort), चांदबिबी महाल (Chandbibi Mahal), मेमोरियल चर्च (Memorial Church), ह्युम मेमोरिअल (Hume Memorial), मेहराबाबा (MehraBaba) तसेच शहरातील धार्मिक स्थळे आधी सर्व ऐतिहासिक ठिकाणांची मला पाहणी करायची आहे. अशी इच्छा आमदार रोहित पवार (MLA Rohit Pawar) यांनी आमदार संग्राम जगताप (MLA Sangram Jagtap) यांच्याकडे महापालिकेला सदिच्छा भेट दिली असता व्यक्त केली. यावेळी महापालिकेच्या कामकाजाची पाहणी करत माहिती घेतली व शहरात सुरू असलेल्या स्मार्ट एलईडी पथदिव्यांच्या योजनेचे (Smart LED Streetlights Scheme) त्यांनी कौतुक केले.
यावेळी आ. संग्राम जगताप, उपमहापौर गणेश भोसले, शिवसेनेचे मा.विरोधी पक्षनेते संजय शेंडगे, स्थायी समितीचे सभापती अविनाश घुले, नगरसेवक प्रकाश भागानगरे, संजय चोपडा, निखिल वारे,अमोल गाडे, संतोष भोसले, नगरसेवक समद खान, आरिफ शेख,निखिल वारे, मनपा उपायुक्त यशवंत डांगे यावेळी उपस्थित होते.









