जामखेड न्युज – – – –
सध्या देशात दुधाची मागणी वाढत आहे तरी शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून गाईचे पालन करून दूध व्यवसायाकडे वळावे असे जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ म्हणाले
महाराष्ट्र राज्य ग्रामीण भागातील जागेचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीवर जामखेड पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड झाल्याबद्दल पिंपळवाडी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला तसेच योगा दूध संकलन केंद्राचे उद्घाटन पोळसाहेब यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी कृषी सहाय्यक वैभव साळवे डॉ. अर्जुन जाधव , बाळासाहेब वराट उपस्थित होते.
Advertisement 
पोळ बोलताना म्हणाले शेतकऱ्यांनी जोडधंदा म्हणून दुग्ध व्यवसायाकडे वळावे त्यासाठी दूध उत्पादकाला गाईच्या संगोपनासाठी K. C. C. योजने मार्फत १५ हजार बँके मार्फत मिळतील तरी शेतकऱ्यांनी संबधीत
अधिकाऱ्याकडे अर्ज जमा करावेत तसेच शासकीय योजनेतुन शेतकऱ्यांनी फळबाग लागवड करावी विविध शासकीय योजनेचा लाभ घ्यावा यावेळी वैभव साळवे डॉ. अर्जुन जाधव यांनी ही मार्गदर्शन केले यावेळी युगा दूध संकलन केंद्राचे संचालक मुकुंद नेमाने , दिलीप घोलप , जालिंदर नेमाने , ग्रामपंचायत सदस्य महारुद्र नेमाने , प्रवीण वराट उध्दव नेमाने , भरत घोलप , प्रकाश घोलप ,दादा मोहिते, नामदेव नेमाने , शहाजी नेमाने , विशाल नेमाने आदि शेतकरी उपस्थित होते आभार बाळासाहेब वराट यांनी मानले
[
युगा दूध संकलन केंद्राचे संचालक मुकुद नेमाने म्हणाले ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना दूध विकण्यासाठी जामखेड शहरात जावे लागते पिंपळवाडी ते जामखेड हे अंतर 10 km आहे त्यामुळे शेतकऱ्यांचा वेळ जातो यामुळे शेतकऱ्यांसाठी आपल्याच गावात दूध विकता यावे म्हणून आम्ही हे दूध संकलन केंद्र सुरू केले आहे आणि शेतकऱ्यांना जी मदत लागेल ती युगा दूध संकलन केंद्राच्या माध्यमातून करण्यात येईल
]









