जामखेड न्युज – – – –
राज्यातील नगर पंचायतीच्या निवडणुकांचे निकाल लागण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील नगर पंचायतीचा पहिला निकाल राष्ट्रवादीच्या बाजूने लागला. त्यानंतर विजयाची घोडदौड कायम ठेवत राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व निर्माण केलं आहे. या निवडणुकीत 17 पैकी 12 जागा जिंकून राष्ट्रवादीने कर्जत नगरपंचायतीवर एक हाती सत्ता आणली आहे. तर भाजपने दोन जागा जिंकल्या आहेत. कर्जतमध्ये राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार आणि भाजपचे राम शिंदे यांच्यात कांटे की टक्कर होती. मात्र, रोहित पवार यांनी राम शिंदेंना कात्रजचा घाट दाखवत कर्जत नगरपंचायतीवर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री राम शिंदे यांनी ज्या मतदारसंघात सर्वाधिक प्रतिष्ठा पणाला लावली होती त्या जागेवर भाजपचा पुन्हा पराभव झाल्याचं दृश्य आहे. कर्जत जामखेड मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांचं पुन्हा एकदा निर्विवाद असं वर्चस्व राहिलं आहे. कारण आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार एकणू 17 जागांपैकी रोहित पवारांच्या राष्ट्रवादी पक्ष पुरस्कृत उमेदवारांचा 11 जागांवर विजय झाला आहे. तसेच एक जागेवर राष्ट्रवादीचा बिनविरोध विजय झालाय. त्यामुळे राष्ट्रवादीने एकूण 12 जागांवरील विजय खिशात घातला आहे. तर राम शिंदे यांच्या गटाला अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे. दुसरीकडे या नगरपंचयातीत काँग्रेसलाही 3 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे कर्जतच्या नगरपंचायत निवडणुकीच महाविकास आघाडीचा तब्बल 15 जागांवर विजय झाला आहे.
कर्जतमध्ये राम शिंदे विरुद्ध रोहित पवार यांच्यात समोरासमोर लढत होती. दोन्ही पक्षाच्या नेत्यांनी मतदारसंघात येऊन ठाण मांडला होता. या दरम्यान आरोप-प्रत्यारोपाच्या राजकारणाला वेग आला होता. पण अखेर नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आता समोर येऊ लागले आहेत. राष्ट्रवादीने कर्जतमध्ये आतापर्यंत सतरापैकी 12 जागांवर विजय मिळवला आहे. तर भाजपल्या अवघ्या दोन जागांवर समाधान मानावं लागलं आहे.