जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – – ( सुदाम वराट)
महाराष्ट्र राज्याच्या ग्रामीण भागातील जागेचा नियोजनपूर्वक विकास करण्यासाठी गठीत करण्यात आलेल्या राज्यस्तरीय समितीमध्ये जामखेड पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड झाली आहे. राज्यस्तरीय समितीवर काम करण्याची संधी मिळाल्याबद्दल पोळ साहेबांवर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
राज्यातील ग्रामीण भागात गावठाण, गायरान, शासकीय व खाजगी मालकीच्या जमिनी उपलब्ध
आहेत. राज्यात ग्रामीण भागाचे मोठया प्रमाणावर नागरीकरण होत आहे, त्याचप्रमाणे राज्यातील मोठया
शहरांशेजारी गावांमध्ये औदयोगिकरण होत आहे. त्यामुळे राज्यात ग्रामीण भागामध्ये विकासासाठी तसेच
निवाऱ्यासाठी मर्यादित जागा उपलब्ध आहेत.गावातील जागेची उपलब्धतता व उपयोग विचारात घेतांना
ग्राम पातळीवर जागेच्या नियोजना करिता कोणतीही व्यवस्था उपलब्ध नाही. त्यामुळे उपलब्ध जागेचा
विकास योग्य प्रकारे होत नाही. ही बाब विचारात घेता गावातील नागरिकांना सामायिक सुविधा उपलब्ध
करुन देण्यास अडचणी निर्माण होत आहेत.
ADVERTISEMENT 

राज्य शासनाने “स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत ग्राम विकासाचे विविध उपक्रम राज्यात राबविण्याबाबत निर्णय घेतला आहे. त्यामध्ये राज्याचे ग्रामीण गृहनिर्माण धोरण विकसित करणे हा उपक्रम अंतर्भुत आहे. सद्यस्थितीत ग्रामीण भागातील जागेचा विकास करताना शहरी भागासाठी अस्तित्वात असलेल्या नगररचना सारखी यंत्रणा उपलब्ध नाही. राज्यातील ग्रामीण भागातील जागेचा विकास करताना जागेचे नियोजन करण्याकरिता धोरण निश्चित करणे आवश्यक आहे. या प्रकरणी ग्रामीण भागातील सध्याची वस्तुस्थिती तसेच यामध्ये सुधारणा करण्यासाठी राज्यातील शहरी भागातील नगर रचना व्यवस्था तसेच देशातील इतर राज्यातील परिस्थिती विचारात घेणे आवश्यक आहे. या संदर्भात वस्तुस्थिती दर्शक शिफारशीसह अहवाल सादर करण्यासाठी राज्यातील १४ अधिकार्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे यामध्ये जामखेडचे कर्तव्यदक्ष गटविकास अधिकारी प्रकाश पोळ यांचा समावेश आहे.
खालीलप्रमाणे समिती गठित करण्यात आली आहे
१) डॉ. राजाराम दिघे, संचालक,राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण, बेलापूर
२) श्री. राजेंद्र क्षीरसागर, मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद, अहमदनगर
३) श्री. श्रीकांत लोंढे, उपसचिव, पंचायत राज, बांधकाम भवन,मुंबई
४) श्री. आर. एम. पवार, उपसंचालक, नगर रचना, पुणे
५) श्री. तुषार माळी, प्रकल्प संचालक,जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा, पालघर
६) श्री. रविंद्र परदेशी, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प. नाशिक
७) श्री. ओमप्रकाश यादव, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) जि.प.परभणी
८) श्री. नंदकुमार वाळेकर,गट विकास अधिकारी,पंचायत समिती,चाळीसगांव जि.जळगांव
९) श्री. प्रकाश पोळ, गट विकास अधिकारी, पंचायत समिती जामखेड, जि. अहमदनगर
१०)श्री. संदीप दिक्षित, विस्तार अधिकारी (पंचायत), जि. प. सातारा
११) श्री. महादेव शिंदे, विस्तार अधिकारी (पंचायत), पंचायत समिती खालापूर, जि. रायगड
१२) श्री. दौलत गांगुर्डे, ग्राम विकास अधिकारी, ग्राम पंचायत पिंप्री सय्यद, ता.जि.नाशिक
१३) श्री. महेंद्र धाकपाडे, ग्रामसेवक, ग्राम पंचायत आमला निमला,ता.धारुर जि.बीड
१४) श्री. नीलेश काळे, उपसंचालक, राज्य व्यवस्थापन कक्ष-ग्रामीण गृहनिर्माण
समितीचे कामकाजासाठी आवश्यकतेनुसार विभागीय / जिल्हास्तरावरील माहितीगार व तज्ञ अधिकारी
यांना बैठकीस आमंत्रित करता येईल. प्रस्तुत विषयाच्या अनुषंगाने, सदर समितीस आवश्यकतेनुसार क्षेत्रिय भेटींचे नियोजन करता येईल. सदर समिती अभ्यास करुन तीन महिन्यांच्या मुदतीमध्ये शासनास अहवाल सादर करील.
राज्यस्तरीय कमिटीवर जामखेड मधील कर्तव्यदक्ष अधिकारी प्रकाश पोळ यांची निवड झाल्याबद्दल विविध क्षेत्रातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.