पोलिसांची मोठी कारवाई; काळ्या बाजारात जाणारा रेशनचा 250 क्विंटल गहू-तांदूळ पकडला

0
241
जामखेड न्युज – – – – 
बीड पोलिसांनी राशन माफियांना चांगलाच दणका दिलाय. बीड शहरात तब्बल 250 क्विंटल काळ्या बाजारात जाणारे गहू आणि तांदूळ भरलेला ट्रक (Truck) पोलिसांनी पकडला आहे. शिवाजी नगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक केतन राठोड यांना गुप्त बातमीदारामार्फत मिळालेल्या माहितीवरून, शहरातील जालना (Jalna) रोड परिसरातील साई हॉटेल समोर MH 23 W 3495 हा ट्रक पकडण्यात आलाय.
                      ADVERTISEMENT
दरम्यान, यामध्ये 250 क्विंटल काळ्या बाजारात जाणारं राशनचं धान्य असल्याचं पोलीस अधिकारी केतन राठोड यांनी सांगितलंय. त्यामुळं हे धान्य कुणाचं आहे ? नेमकं तो राशन (Ration) माफिया कोण ? याची माहिती पोलीस (Police) घेत आहेत.
तर, बीड (Beed) जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात राशन माफिया सक्रिय असून गोरगरिबांच्या तोंडातील अन्न हे काळ्याबाजारात (Black Market) विक्री करत आहेत. त्यामुळे राशन माफियांवर MPDA ऍक्ट नुसार कारवाई करावी. अशी मागणी दक्षता समिती सदस्य राजू महुवाले यांनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here