जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन दिल्ली आणि जामखेड येथील कोठारी प्रतिष्ठानच्या संयुक्त विद्यमाने राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ व श्री स्वामी विवेकानंद यांची जयंती साजरी करण्यात आली.
सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यावेळी म्हणाले, जैन कॉन्फरन्स चतुर्थ झोन आणि कोठारी प्रतिष्ठानच्या मार्फत आम्ही सर्व महापुरुषांच्या जयंती , पुण्यतिथी साजऱ्या करत असतो. रक्तदान शिबिरे, कोरोना काळामध्ये अनेकांना मदत, पोलिसांच्या आरोग्य तपासण्या, सर्वरोग निदान शिबिरे, वृक्षारोपण ,वृद्धाश्रमातील वृध्दाना मदत असे उपक्रम प्रतिष्ठाणच्या वतीने राबवत असतो. जैन कॉन्फरन्सचे काम संपुर्ण देशात चांगल्या प्रकारे चालु आहे आणि आम्ही सदस्य म्हणून सामाजिक काम करण्याचा प्रयत्न करत असतो.
ADVERTISEMENT
यावेळी सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी, वैद्यकीय अधीक्षक डॉ संजय वाघ, पत्रकार संघाचे अध्यक्ष नासीर पठाण, शिवनेरी अकॅडमी चे संचालक लक्ष्मणराव भोरे, दि. पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे खजिनदार राजेंद्र मोरे, अरुण लटके , सुनील जगताप, सचिन पवार, धनराज पवार, श्याम जाधवर, आयसीआय बँकेचे गणेश देवकाते उपस्थित होते.