जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – – –
राजमाता राष्ट्रमाता स्वराज्य जननी जिजामाता व स्वामी विवेकानंद यांचे विचार सर्व समाजासाठी प्रेरणादायी आहेत. तरूणांनी व महिलांनी या विचारांच्या आचरणातून आपल्या जीवनात परिवर्तन घडवून आणावे असे प्रतिपादन सेवा निवृत्त कॅप्टन लक्ष्मणराव भोरे यांनी केले.
ADVERTISEMENT 

जामखेड येथील शिवनेरी स्वप्नपूर्ती करिअर अकॅडमी येथे स्वामी विवेकानंद व राजमाता जिजाऊ यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी उपस्थितांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
यावेळी पुढे बोलताना कॅप्टन लक्ष्मणराव भोरे म्हणाले की, शिवनेरी करिअर अकॅडमीची स्थापनाच मुळात स्वामी विवेकानंद, राजमाता जिजाऊ व छत्रपती शिवाजी महाराज अशा महापुरुषांच्या प्रेरणादायी विचारातून करण्यात आली आहे. यामुळे येथे प्रशिक्षण घेतलेले १५० च्या वर तरुण तरुणी सैन्य दल, पोलीस दल अशा विविध ठिकाणी भरती होऊन देशसेवा करत आहे.
जर आपण अशा महान व्यक्तींचे विचार आपल्या जीवनात आणले तर नक्कीच परिवर्तन होईल असेही प्रतिपादन भोरे यांनी यावेळी केले. यावेळी शिवनेरी अकॅडमीचे सर्व बहादुर विद्यार्थी उपस्थित होते.