कोरोनाला पराभूत करून रोहित पवार कर्जतच्या रिंगणात

0
179
जामखेड न्युज – – – – 
कर्जत नगरपंचायत निवडणुकीतील दुसऱ्या टप्प्याला सुरवात झाली आहे. भाजपने कालपासून ( सोमवार ) प्रचाराला सुरवात केली आहे. आमदार रोहित पवार यांना कोरोना झाल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचा प्रचार काहीसा थंडावला होता. मात्र आता रोहित पवार ( Rohit Pawar ) कोरोनातून बरे झाले आहेत. उद्या ( बुधवारी ) ते कर्जतमध्ये येणार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( NCP ) गोटात उत्साहाचे वातावरण आहे. After defeating Corona, Rohit Pawar in Karjat’s arena
                        ADVERTISEMENT
 
भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे यांनी काल भाजपच्या प्रचाराला सुरवात केली. मात्र रोहित पवार नसल्यामुळे राष्ट्रवादीच्या प्रचाराला धार नव्हती. आमदार रोहित पवार यांनी आज रात्री ट्विट करत आपण कोरोनातून बरे झाल्याचे कळवत आगामी दौऱ्याचा कार्यक्रम जाहीर केल्याने राष्ट्रवादीच्या गोटात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे.
रोहित पवार यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, कोरोनामुळं थोडा त्रास होत असताना आपल्या सर्वांच्या सदिच्छा, प्रेम आणि वडीलधारी मंडळींच्या आशिर्वादामुळं मी त्यातून यशस्वीपणे बाहेर पडलो. आता माझी तब्येत उत्तम आहे, त्यामुळं उद्या माझ्या मतदारसंघातील कर्जत शहराच्या दौऱ्यापासून मी पुन्हा नव्या जोमाने आपल्या सेवेत हजर होत आहे, असे सांगितले आहे. शिवाय 18 जानेवारी पर्यंतचे दौऱ्याचे वेळापत्रक दिले आहे.
18 जानेवारीला कर्जत नगरपंचायतचे चार प्रभागांसाठी मतदान होईल तर 19 जानेवारीला सर्व 17 प्रभागांची मतमोजणी होणार आहे. त्यामुळे आमदार रोहित पवार यांची एन्ट्री ही धमाकेदार होणार हे आता स्पष्ट झाले आहे. रोहित पवार भाजपच्या आरोपांना काय उत्तर देणार याकडे राज्याचे लक्ष्य लागले आहे. रोहित पवार व राम शिंदे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केल्याने ही निवडणूक राज्यभर चर्चेचा विषय ठरली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here