जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
खेमानंद इंग्लिश मेडियम स्कुलचा समर्थ मारूती ढमाळ पाचवी शिष्यवृत्ती 238 गुण घेऊन तालुक्यात प्रथम आला आहे तर जिल्ह्यात 54 वा क्रमांक पटकावला आहे यामुळे त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षांव होत आहे.
वेगवेगळ्या स्पर्धा परीक्षेत खेमानंद इंग्लिश मेडियम स्कूल नेहमीच अग्रेसर असते दरवर्षीच स्पर्धा परीक्षेत येथील विद्यार्थी चांगले यश संपादन करतात मुख्याध्यापक व सर्व स्टाफ चांगली तयारी करून घेतो त्यामुळे हे शक्य होत आहे.
ADVERTISEMENT 

समर्थ मारूती ढमाळ यांच्या यशाबद्दल संस्थेचे संस्थापक अध्यक्ष खासदार सदाशिवराव लोखंडे साहेब, अध्यक्ष डॉ. चेतन लोखंडे, उपाध्यक्ष विजय पवार, सचिव सतिश शिंदे, प्राचार्य शिवानंद हालकुडे सह सर्व स्टाफ व पालकांनी अभिनंदन केले आहे.