दिव्या मुरूमकरचे शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धेत यश – दत्तवाडी शाळेची सर्वांगीण गुणवत्तेची सातत्यपूर्ण परंपरा

0
218

जामखेड प्रतिनिधी 

                    जामखेड न्युज – – – – (सुदाम वराट) 

 

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांचेतर्फे सन2020- 21 मध्ये घेतलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती (इ.5वी) परीक्षेत तालुक्यातील नान्नज केंद्रांतर्गत येणा-या जि.प.प्रा.शाळा दत्तवाडी (धोंडपारगाव)येथील इयत्ता 5वीची विद्यार्थीनी कु.दिव्या पांडुरंग मुरूमकर हिने 300 पैकी 254गुण मिळवत ग्रामीण भागातून सर्वसाधारण गटात जिल्हागुणवत्ता यादीत 8वे स्थान मिळवत उज्ज्वल यश संपादित केले.

शिष्यवृत्ती परीक्षा ही विद्यार्थ्यांच्या भविष्यातील सर्व महत्त्वाच्या शासकीय स्पर्धा परीक्षांचा पाया मानली जात असल्याने या परीक्षेतील यशाला शैक्षणिक व सामाजिकदृष्ट्या विशेष महत्त्व मानले जाते.

दिव्याने यापूर्वी मुंबई येथील अनुयोग शिक्षण संस्था खार (पूर्व) आयोजित 22 व्या राज्यस्तरीय ऑनलाईन बालकुमार साहित्योत्सवात प्रभावी कथाकथन केले होते,तर दि विद्यावर्धिनी एज्युकेशनल ट्रस्ट आयोजित भव्य कथाकथन स्पर्धेत तिने सादर केलेल्या ‘जिद्द’ या सत्यघटनाधिष्ठीत ,प्रेरणादायी व ह्रदयस्पर्शी कथेचा महाराष्ट्रात तिसरा क्रमांक आला होता.

दैनिक मराठवाडा साथीच्या 41व्या वर्धापनादिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय ऑनलाईन बालधमाल स्पर्धेत तिने संत मुक्ताबाईची वेशभूषा प्रभावीपणे सादर करून सर्वांना मंत्रमुग्ध केले होते.

महाराष्ट्र शासनाने ‘किशोर’ मासिक निर्मितीच्या सुवर्णमहोत्सवी वर्षानिमित्त आयोजित केलेल्या राज्यस्तरीय ‘किशोर गोष्टी’ स्पर्धेत तिने प्रसिद्ध बालसाहित्यिक एकनाथ आव्हाड यांची ‘ओवाळणी’ ही कथा अप्रतिमरित्या सादर केली.तिला या सर्व स्पर्धेसाठी आदर्श शिक्षक मनोहर इनामदार यांचे मार्गदर्शन लाभले होते.

ADVERTISEMENT

शिष्यवृत्ती परीक्षेसह विविध स्पर्धेत यश मिळवत जामखेड तालुक्याचे नाव उज्ज्वल केल्याबद्दल धोंडपारगावचे सुपुत्र असलेले ज्येष्ठ उद्योगपती तथा प्रहार संघटनेचे राज्यप्रवक्ते संतोष पवार, तालुक्याचे कार्यक्षम गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, गटशिक्षणाधिकारी नागनाथ शिंदे , नान्नजचे केंद्रप्रमुख बाबासाहेब कुमटकर, धोंडपारगाव ग्रा.पं.च्या सरपंच सौ.मनीषा औदुंबर शिंदे,उपसरपंच पै.दत्ता शिंदे,सोसायटीचे चेअरमन हनुमंत शिंदे ,पोलीस पाटील रामचंद्र शिंदे, दत्तवाडीशाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सुशिलकुमार धुमाळ,उपाध्यक्ष गणेश कुमटकर आदिंसह सर्व पालक,ग्रामस्थ व तालुक्यातील शिक्षक बांधव यांनी दिव्याचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here