जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
समाजातील अडीअडचणी प्रशासनासमोर आणण्याचे काम तसेच प्रशासनाचे काम समाजापर्यंत पत्रकार पोहोचवतात करतात म्हणून पत्रकार हा समाजाचा खरा आरसा असतो असे मत तहसीलदार योगेश चंद्रे यांनी पत्रकार दिनानिमित्त व्यक्त केले.

जामखेड पत्रकार संघाच्या वतीने मराठी पत्रकारीते चे जनक दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या २१० व्या जंयती निमित्त पत्रकार दिन साजरा करण्यात आला.
याप्रसंगी जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे साहेब यांच्या हस्ते प्रतिमा पूजन करून अभिवादन करण्यात आले. तसेच अनाथांची माय पद्मश्री सिंधूताई सपकाळ यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.
ADVERTISEMENT 

यावेळी जामखेड पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष नासिर पठाण, उपाध्यक्ष अशोक निमोणकर, सचिव मिठुलाल नवलखा, सहसचिव अविनाश बोधले, खाजिनदार सुदाम वराट, मोहिद्दीन तांबोळी, बाळासाहेब वराट, प्रसिद्धी प्रमुख धनराज पवार, यासिन शेख, नंदुसिंग परदेशी, पोपटराव गायकवाड, संतोष गर्जे, अशोक वीर, समीर शेख, किरण शिंदे, राजू भोगिल, राजू म्हेत्रे, वसंत राळेभात, संतोष थोरात, दत्तराज पवार, अनिल धोत्रे, किशोर दुशी, सुजित धनवे, गणेश जव्हेरी, पप्पू सय्यद, अजय अवसरे, रोहित राजगुरू, जाकीर शेख, रियाज शेख सह जामखेड पत्रकार संघाचे सर्व सदस्य उपस्थित होते.
यावेळी बोलताना तहसीलदार योगेश चंद्रे म्हणाले की, पत्रकारांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी प्राधान्याने विचार केला जाईल कारण पत्रकार शासनाच्या विविध योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवतात.
यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त केली
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन अविनाश बोधले यांनी तर आभार बाळासाहेब वराट यांनी मानले.