जामखेड न्युज – – – –
कोरोनाची महामारी लक्षात घेता कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण गरजेचे आहे हे ओळखून आमदार रोहित पवारांच्या पाठपुराव्यामुळे शहरासह तालुक्यातील अनेक गावात लसीकरण कॅम्प आयोजित करण्यात आले आहेत यात शुक्रवार दि.07/01/20210रोजी कोरोना लसीकरण 18 वर्षावरील नागरिकांना दूसरा डोस पण शंभर टक्के पुर्ण झाला त्यामुळे तालुक्यातील बावी हे परत एकदा पहिले शंभर टक्के लसीकरण झालेले गाव ठरले आहे.
बावी ता. जामखेड येथे 100% लसीकरणचा दुसरा डोस देण्यात आला त्यावेळी गावचे सरपंच निलेश पवार, ग्रामपंचायत सदस्य राहुल कवादे, राम पवार, ग्रामसेवक फरताडे भाऊसाहेब, ग्रामपंचायत कर्मचारी अशोक राऊत यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

बावी ग्रामपंचायतला तहसीलदार योगेश चंद्रे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ तसेच आरोग्य ग्रामीण अधिकारी डॉ. सुनील बोराडे, डॉ. संजीवनी कल्पेश बारस्कर सामुदाय आरोग्य अधिकारी, सुपरवायझर डॉ. राख, आरोग्य सेवक बांगर, ए. एन. एम. नागरगोजे मॅडम सौ सुलभा महादेव शिंदे आशा स्वयंसेविका यांचे वेळोवेळी सहकार्य मिळाले व पुरेश्या प्रमाणात लस उपलब्ध करून दिल्याने आम्ही बावी गाव १००% दुसरा डोस लसीकरण पूर्ण केले त्या बद्दल सरपंच, उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य यांच्या वतीने टीमचे आभार मानण्यात आले. त्यासाठी सौ सुलभा महादेव शिंदे आशा स्वयंसेविका, अंगणवाडी सेविका विमल पवार, मधुमती रंधवे, शारद पवार तसेच सामाजिक कार्यकर्ते इमाम पठाण, अशोक शिदे, संतोष पवार, योगेश पवार, रवि शिंदे, रामकृष्ण पवार, गौरव भिसे अमृत कारंडे ओंकार रंधवे तसेच इतर ग्रामस्थ यांचे पण खूप मोठ्या प्रमाणात योगदान लाभले त्याबद्दल त्याचे पण आभार मानले.
गावाची लोकसंख्या दीड हजाराच्या आसपास आहे आगोदरही तीन – चार कॅम्प घेतले होते तर काही लोकांनी नान्नज, जामखेड व हळगांव येथे जाऊन लस घेतली होती. आता दूसरा डोस 18 वर्षावरील नागरिकांना शंभर टक्के झाला आहे त्यामुळे जामखेड तालुक्यातील शंभर टक्के लसीकरण झालेले बावी हे पुन्हा एकदा पहिले गाव ठरले आहे.