जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
जामखेड येथे शाखा अभियंता असणारे कार्यक्षम व कर्तव्यदक्ष अधिकारी शशिकांत सुतार यांची नुकतीच रत्नागिरी येथे पत्तन अभियंता खाण व संरक्षण विभाग भगवती बंदर रत्नागिरी येथे पदोन्नती झाली याबद्दल जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने सत्कार करण्यात आला.
यावेळी सुतार साहेबांचा सत्कार करताना शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, पत्रकार सुदाम वराट, पेंटर मुडके यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
ADVERTISEMENT 

शशिकांत सुतार यांचे शालेय शिक्षण जामखेड येथेच झाले तर महाविद्यालयीन स्थापत्य अभियंता पदविका शिक्षण बीड येथे झाले. १९९७ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून नगर येथे नोकरीस प्रारंभ झाला चार वर्षे नगर, चार वर्षे राहुरी, चार वर्षे श्रीगोंदे, परत सहा वर्षे नगर, व पाच वर्षे जामखेड येथे नोकरी केली. एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून त्यांनी ख्याती आहे त्यामुळे अति महत्त्वाच्या नगर मुख्यालयी सहा वर्षे उत्तमपणे काम पाहिले.
आता शाखा अभियंता पदावरून उपअभियंता पदी पदोन्नती मिळाली आहे ते आता रत्नागिरी येथे पत्तन अभियंता खाण व संरक्षण विभाग भगवती बंदर रत्नागिरी येथे पदोन्नती मुळे बदली झाली आहे त्यामुळे जामखेड तालुका शिवसेनेच्या वतीने त्यांचा सत्कार करण्यात आला.
दिपक सुरसे यांचा वाढदिवसानिमित्त सत्कार करताना

तसेच दिपक सुरसे यांचा वाढदिवसही यावेळी साजरा करण्यात आला यावेळी शिवसेना तालुकाप्रमुख संजय काशिद, युवा सेना तालुकाप्रमुख सावता हजारे, भैया जगताप, प्रशांत आयकर हे हजर होते.





