नितेश राणेंना जेल की बेल – याचा निर्णय गुरुवारी 

0
234
जामखेड न्युज – – – 
नितेश राणेंच्या जामीन अर्जावर उद्या सिंधुदुर्ग सत्र न्यायालय सुनावणी होणार आहे. आजचा युक्तिवाद संपला असून उद्या या जामीन अर्जावर निर्णय दिला जाणार आहे. संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणेंच्या यांच्यावर अटकेची टांगती तलवार कायम आहे. नितेश राणेंना जेल होणार ही बेल मिळणार, याचा निर्णय गुरुवारी जाहीर होणार आहे.
मंगळवार दुपारपासून नितेश राणेंच्या जामीनअर्जावर सिंधुदुर्ग जिल्हा सत्र न्यायालयात युक्तिवाद सुरु आहे. मंगळवारी कोर्टाची वेळ संपल्यामुळे बुधवारी पुन्हा या युक्तिवादाला सुरुवात करण्यात आली होती. आज खरंतर नितेश राणेंच्या जामीनअर्जावर नेमका काय निर्णय होतो, हे स्पष्ट होणं अपेक्षित होतं. मात्र अखेर आता गुरुवारी या जामीनअर्जावरचा निर्णय कोर्ट जाहीर करणार आहे. सरकारी वकील आणि नितेश राणेंचे वकील या दोघांचाही युक्तिवाद आता पूर्ण झाला असून उद्या नितेश राणेंना जामीन मिळणार की अटक होणार, याबाबतचं चित्र स्पष्ट होणार आहे.
संतोष परब हल्लाप्रकरणी नितेश राणे यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले आहे. पोलिसांना नितेश राणे यांची चौकशी करायची आहे. मात्र नितेश राणे नेमके कुठे आहे, याचा शोध अद्याप लागू शकलेला नाही. तर दुसरीकडे मंगळवारी कोर्टानं नितेश राणेंना अंतरीम जामीन देण्याची वकील संग्राम देसाई यांची मागणी फेटाळली होती. दरम्यान, भाजप आमदार नितेश राणे हे नेमके कुठे आहे, याचंही गूढ कायम आहे. त्याच पार्श्वभूमीवर पोलिसांनी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना पोलिसांंनी नोटीस पाठवली होती. ही नोटीस नारायण राणेंच्या घरावर चिकटवण्यात आली होती. ही नोटीस दहा मिनिटांतच काढूनही टाकण्यात आली. दरम्यान, आता नारायण राणेंनीही या नोटीसीला प्रत्युत्तर दिलंय.
काय म्हणाले नारायण राणे?
मी व्यस्त असल्यानं चौकशीला येऊ शकत नाही. दोन ते तीन दिवस मी व्यस्त असणार आहे. तुम्ही व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे माझा जबाब नोंदवू शकता, असं उत्तर केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पोलिसांच्या नोटिशीला दिलं आहे. आता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे पोलिस केंद्रीय मंत्री नारायण राणेंचा जबाब नोंदवतात का, हेही पाहणं महत्त्वाचं आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here