Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या आधारभूत किंमत खरेदीयोजनेंतर्गत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

आधारभूत किंमत खरेदीयोजनेंतर्गत तूर खरेदीसाठी शेतकऱ्यांना नोंदणी करण्याचे आवाहन

0
283

जामखेड न्युज – – – –

केंद्र शासनाच्या आधारभुत किंमत खरेदी योजनेंतर्गत सन 2021-22मध्ये तुर या शेतमालाची शेतकरी नोंदणी व खरेदी प्रक्रिया नाफेडच्यावतीने मार्केटींग फेडरेशनमार्फत राबवली जात आहे. यासाठी शेतकऱ्यांची नोंदणी करणे आवश्यक आहे. त्याकरीता 20 डिसेंबर, 2021 पासून तुर या शेतमाल शेतकरी नोंदणी प्रक्रिया सुरु करण्यात आलेली असून, जिल्हयामध्ये एकुण 12 खरेदी केंद्र प्रस्तावित करण्यात आले आहेत. या केंद्रावर शेतकरी नोंदणी सुरु झाली आहे.

तुर शेतीमालाला प्रति क्विंटल 6300/- रुपये हमीभाव आहे. शेतकरी नोंदणी केंद्राचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. राहुरी ता.सह. खरेदी विक्री संघ, राहुरी (संपर्क नं.9309944605) संगमनेर सह.खरेदी विक्री संघ, संगमनेर (संपर्क नं.9850319568) श्रीगोंदा ता.श्रीगोंदा सह. खरंदी विक्री संघ, (संपर्क नं.9923721191) कर्जतकर फार्मर प्रोडुसर कंपनी, कर्जत (संपर्क नं.9503031010) सुखायु फार्मर प्रोडुसर कंपनी, बोधेगाव ता. शेवगाव (संपर्क नं.7972090331) शिवरत्न मल्टीपर्पज को.ऑप सो., खर्डा ता.जामखेड (संपर्क क्र.9422200001) पाथर्डी जय भगवान मल्टी पर्पज को.ऑप सो. (संपर्क क्र. 8329404135) शेवगाव तालूका सह.खरेदी विक्री संघ, शेवगाव (संपर्क क्र. 9011541646) नगर तालुका सहकारी खरेदी विक्री संघ,अहमदनगर (संपर्क क्र. 9689630321) श्रीराम बी बियाणे उत्पादक कंपनी, साकत, ता.नगर (संपर्क क्र.8275391207) जय किसान बहुउददेशीय सह. संस्था, माडवगण ता.श्रीगोंदा (संपर्क क्र. 9422223719) पारनेर कृषी उत्पन्न बाजार समिती, पारनेर (संपर्क क्र.9028055070). श्रीरामपुर, कोपरगांव, राहाता या तालुक्यामध्ये तुरीचा पिकपेरा कमी प्रमाणात असल्यामुळे या तालुक्यामध्ये तूर खरेदी केंद्र सुरु नाही. सदर तालुक्या तील शेतकऱ्यांनी राहरी येथील खरेदी संपर्क साधावा. नेवासा तालुका हा तुर खरेदी करीता शेवगाव खरेदी केंद्रास जोडण्यात आलेला आहे. शेतमाल नोदणी करीता शेतक-यांचे आवश्यक दस्तऐवज पुढीलप्रमाणे आहे. 8 अ उतारा, शेतकरी 7/12 उतारा (7/12 उता-यावर ऑनलाईन पीक पेरा नोंद असावी). शेतकरी आधारकार्ड छायांकित प्रत, बँक खाते पासबुक छायांकित प्रत, (शक्यतो कॅन्सल केलेला चेक किंवा बॅक खाते बाबत पुर्ण माहिती असलेले बँक स्टेटमेंट), बँक खाते हे जनधन नसावे तसेच बंद झालेले बँक खाते नसावे) ज्या तालुक्यातील क्षेत्र (जमीन) आहे त्याच तालुक्यातील खरेदी केंद्रावर शेतक-यांनी नोंदणी करावी करावी. अधिक माहितीसाठी जिल्हा मार्केटिंग अधिकारी कार्यालय, अहमदनगर येथे संपर्क साधावा असे जिल्हा मार्केटिंग अधिकारी, अहमदनगर यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!