Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करावे. – तहसीलदार योगेश चंद्रे...

जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करावे. – तहसीलदार योगेश चंद्रे २६ डिसेंबर नंतर ज्या अस्थापनातील कामगारांनी लस घेतली नसेल त्या अस्थापनावर कारवाई होणार – दुकानाच्या बाहेर NO MASK NO ENTRY फलक लागणार

0
508
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – – 
वाढत्या कोविड आजाराच्या पार्श्वभूमीवर जामखेड तालुक्यातील सर्व नागरिकांनी कोविड लसीकरण पूर्ण करून घ्यावे. सद्यपरिस्थित ओमायक्रोन या कोविड च्या नवीन प्रकारामुळे दिवसेंदिवस बाधित लोकांची आकडेवारी वाढत  आहे. सध्यातरी कोविड आजारावर शासानामार्फात उपलबद्ध करून दिलेले  कोविशिल्ड आणि कोव्हक्सीन या लस उपलबद्ध आहेत. तेव्हा प्रसिद्धी पत्रकाद्वारे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी ज्या लोकांनी अद्यापही लस घेतलेली नाही अशा तालुक्यातील नागरिकांना आवाहन केले आहे.
    कोविड आजाराची तीव्रता कमी करण्यासाठी सध्यातरी लासिकारानाशिवाय दुसरा पर्याय दिसून येत नाही. त्यामुळे भविष्यातील हानी टाळण्यासाठी उर्वरित सर्व लोकांनी लसीकरण करून घेणे महत्वाचे आहे. सर्व लोकांनी लसीकरण करून घ्यावे म्हणून शासनाचे सर्व विभाग प्रयत्न करत आहे, लसीचा पुरवठा सुद्धा पूर्ण आहे परंतु आपल्यामधील गैरसमजामुळे उर्वरित लोक लस घेण्यास नकार देत आहे. लस घेतल्याने कोणताही दुष्परिणाम होत नाही त्यामुळे आपण सर्वांनी निसंकोचपणे लस घेणे गरजेचे आहे.
     आरोग्य विभागाकडे  गावातील लस न घेतलेल्या लोकांची यादी उपलबद्ध आहे त्याप्रमणे आपण  सर्वांनी प्रशासनास लस घेऊन सहकार्य करावे.  तसेच सर्व आस्थापाना यांना आव्हाहन करण्यात येते कि,आपण आपल्या दुकानातील सर्व कामगार यांचे लसीकरण दिनांक २६/१२/२०२१ पर्यंत पूर्ण करून घ्यावे. दिनांक २६/१२/२०२१ नंतर सर्व अस्थापना प्रशासनाकडून तपासणी केल्या जाणार असून जर कुठे लस न घेतलेले कामगार आढळल्यास संबंधित आस्थापना वर कार्यवाही केली जाईल याची सर्व  आस्थापनाधारक यांनी गांभीर्याने नोंद घ्यावी. तसेच आपल्या आस्थापना मध्ये येणाऱ्या लोकांनी मास्क लावणे बांधण्कारक करावे, त्यासाठी दुकानाच्या बाहेर “NO MASK NO ENTRY” असे बोर्ड लावावे. विना  मास्क व्यक्ती दुकानामध्ये आढळल्यास संबंधित व्यक्ती तसेच आस्थापना यांचेकडून दंड वसूल केला जाईल याची नोंद घ्यावी. कोविड आजारावर सध्या प्रभावी उपाय म्हणून लसीकरण करणे आणि मास्क व sanitiser चा वापर करणे हे आहेत. त्यामुळे  सर्वप्रथम सर्व उर्वरित नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे. सार्वजनिक ठिकाणी  मास्क चा प्रभावी वापर करावा .आत्तापर्यंत कोविड आजारावर मात करण्यासाठी जामखेड मधील नागरिकांनी चांगल्या प्रकारे साथ दिली आहे पुढेही देत राहावी.   कोविड चे नियम न पाळणाऱ्या नागरिकांना कार्यवाहीस सामोरे जावे लागेल याची सर्व नागरिकांनी खबरदारी घ्यावी .

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!