जामखेड न्युज – – –
जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी सोसायटी अहमदनगर, संचालक मंडळ निवडणूक 19 डिसेंबर रोजी पार पडली
सत्ताधारी जय श्री गणेश पॅनल ने या निवडणुकीत सर्व च्या सर्व म्हणजे 21 विरुद्ध 00 असा विरोधी पॅनल चा धुव्वा उडवत विजय मिळवला.

अरुण जोर्वेकर, संजय कडूस, विलास शेळके, इंदुमती गोडसे, किशोर येळपनेकर अश्या अनुभवी माजी संचालकांच्या मार्गदर्शन खाली जय श्री गणेश चे सर्व उमेदवार अधिकाधिक मताधिक्याने निवडून आले. या निवडणुकीत आणखी एक इतिहास घडला, जामखेड ची जागा ही सर्वसाधारण प्रवर्ग साठी असताना पॅनल ने त्या जागेवर महिला सौं ज्योती अनिल साहेबराव पवार / जावळे यांना संधी दिली, आर्दश आरोग्यसेविका पुरस्कार प्राप्त आणि जिल्हा आरोग्यसेविका संघटनेच्या उपाध्यक्ष असलेल्या सौं ज्योती पवार ह्या 1275 मते घेत 300 च्या फरकाने निवडून आल्या.. पराभव झालेले दोन पॅनल जय पावन गणेश आणि मंगलमूर्ती यांनी ऐन वेळी युती करून सुद्धा एका ही जागेवर उमेदवार निवडून आला नाही आणि 21/00 असा पराभव पदरी आला.
पारदर्शक कारभार, निष्कलंक माजी संचालक मंडळ आणि अनुभवी पॅनल प्रमुख यांच्या नेतृत्व खाली व तालुक्यातील सभासदांशी असलेले सलोख्याचे संबंध, व माझ्या आजपर्यंत च्या कामकाजाची पद्धत, संघटनेच्या माध्यमातून सभासदांच्या प्रश्नाकडे जातीने लक्ष दिल्या मुळेच मला सर्वाधिक मताधिक्याने विजय मिळाला असे संचालक श्रीमती ज्योती पवार / जावळे यांनी सांगितले.
ज्योती पवार /जावळे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाल्याबद्दल वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय वाघ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुनील बोराडे, गटविकास अधिकारी प्रकाश पोळ, जामखेड पत्रकार संघाचे अध्यक्ष नासिर पठाण व सर्व सदस्य यांनी अभिनंदन केले आहे.









