म्हशीची रेडा देशात चर्चा; सेल्फीसाठी होते हजारोंची गर्दी!

0
359
जामखेड न्युज – – – 
सोशल मीडियावर कधी कोणती बातमी चर्चेत येईल याचा नेम नाही. सध्या सांगलीतील एक म्हैस चर्चेत आली आहे. या म्हैशीची सध्या शेतकरी वर्गात देशभर चर्चा सुरु आहे. चर्चेत असलेल्या या म्हशीचे ( रेडा) नाव गजेंद्र आहे. सांगली जिल्ह्यातील तासगाव येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेने आयोजित केलेल्या आठव्या कृषी, पशु, पक्षी प्रदर्शनात ही रेडा म्हैस आली होती. ज्यांनी ही म्हैस पाहिली ते लोक तिला पाहतच राहिले. बऱ्याच शेतकऱ्यांना या जातीची म्हैस खरेदी करायची इच्छा आहे. त्यामुळे त्यांच्या उत्पन्नात वाढ होईल, असा त्यांचा विश्वास आहे. संपूर्ण परिसरात सर्वत्र गजेंद्र म्हशीची चर्चा होत आहे.
किंमत तब्बल ८० लाख
गजेंद्र या म्हशीचे वजन सुमारे दीड टन म्हणजेच १५०० किलोची आहे. तिची किंमत ८० लाख रुपये आहे. महाराष्ट्र-कर्नाटक सीमाभागातील मंगसुळी गावात राहणारे शेतकरी विलास नाईक यांची ही म्हैस आहे. तसंच या म्हशीसोबत सेल्फी काढण्यासाठीही खूप गर्दी होत असते. या म्हशीचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. ती दिसायला खूप जड आणि आरोग्यदायी असल्यामुळे त्यांनी तिचं नाव गजेंद्र ठेवले. ही म्हैस पाहण्यासाठी दूरवरून लोक येत असतात.
म्हैस दररोज १५ लिटर दूध पिते
ही म्हैस दररोज १५ लिटर दूध पिते. याशिवाय हिरवे गवत आणि दिवसातून चार वेळा ऊस खायला दिला जातो. या प्रकारचा प्राणी पुनरुत्पादनासाठी पाळला जातो. त्यांच्या शुक्राणूंपासून चांगल्या जाती निर्माण होतात. त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा होऊ शकतो. चांगल्या प्रतीच्या म्हशींमुळे उत्पन्नाचा फायदा होईल, असा शेतकऱ्यांचा विश्वास आहे. मात्र त्यांची काळजी घेणे देखील सोपं नाही. वेळोवेळी वैद्यकीय तपासणी करणं आवश्यक आहे. त्यांचा सांभाळ सामान्य म्हशींपेक्षा खूप जास्त असतो. या जातीच्या म्हशी दूध जास्त देतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here