जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – – –
श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्था संचलित साकत फाटा, बीड रोड जामखेड येथील नवज्योत प्रकल्पातील वयोवृद्ध व मुलांना कुसडगाव येथील कार्यसम्राट सरपंच बापुसाहेब कार्ले यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने अल्पोपहाराचे वाटप करण्यात आले. यावेळी त्यांचे प्रकल्पातील वृद्ध महिलांनी औक्षण केले व संस्थेच्या वतीने सत्कार केला.
या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, उद्योजक हवा (दादा) सरनोबत, सनी सदाफुले, बाबासाहेब डोंगरे, विधाते सर आदी मान्यवर उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांचे शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व संस्थेचे माहितीपत्रक देऊन सत्कार करण्यात आला.
बापुसाहेब गायकवाड यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की संस्थेच्या माध्यमातून विविध उपक्रम राबविले जात असून त्यातीलच एक भाग म्हणून हा प्रकल्प सुरू केला आहे.
प्रदिप टापरे यांनी बोलताना सांगितले की, बापुसाहेब कार्ले यांनी स्वतः च्या वाढदिवसानिमित्त गोरगरीब वयोवृद्ध व मुलांना मदत करण्याचा निर्णय घेतला त्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले व वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
हवा सरनोबत यांनी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यात वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरु करून नवज्योत प्रकल्पाची निर्मिती झाली असून याठिकाणी गोरगरिबांना आश्रय उपलब्ध करून दिला असून सरपंच बापुसाहेब कार्ले यांचा आदर्श घेऊन तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्या घासातील देऊन या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन केले.
बापुसाहेब कार्ले यांनी बोलताना सांगितले की तालुक्यातील सर्वच सरपंचांनी आपण प्रत्येक गावचा प्रमुख म्हणून जी जबाबदारी पार पाडत आहोत त्यातीलच एक भाग म्हणून आपण अनाथ निराधार मुले तसेच वृद्धांना मदत करणे आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले व नवज्योत प्रकल्पाच्या वतीने वाढदिवसाच्या निमित्ताने सत्कार केला त्याबद्दल आभार मानले.
यावेळी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांचे आभार संतोष गर्जे यांनी मानले. यावेळी कार्यक्रमास दिपक नेटके, राहुल जगताप, अशोक कार्ले, विशाल भांडवलकर, आकाश साठे, पत्रकार धनराज पवार, जाधव सर, आरेकर सर आदींसह नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुले उपस्थित होते.