आरोग्य विभागातील हिवताप कर्मचार्‍यांचे दुसर्‍या दिवशीही कामबंद आंदोलन सुरूच

0
263
जामखेड प्रतिनिधी
             जामखेड न्युज – – – – 
सार्वजनिक आरोग्य सेवेअंतर्गत कार्यरत असलेल्या राज्य शासकीय हिवताप विभागातील कर्मचाऱ्यांवर शासनाने अन्याय केल्यामुळे दि ता.१४ डिसेंबर पासून जामखेड हीवताप विभागातील सर्व कर्मचार्‍यांनी सुरू केलेले कामबंद आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरुच ठेवले आहे.
हिवताप विभागासाठी असलेले जुने सेवाप्रवेश नियम २९ सप्टेंबर २०२१ रोजी नवीन अधिसूचना काढून रद्द केले आहेत. आरोग्य सेवक या पदासाठी पूर्वी दहावी शैक्षणिक पात्रता असताना ती आता बारावी विज्ञान करण्यात आली आहे, आरोग्य सहाय्यक या पदासाठी आरोग्य सेवक या संवर्गातून पदोन्नतीने देण्याचे पद असूनही सहाय्यक पदाची शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर करण्यात आली आहे.
आरोग्य पर्यवेक्षक हे पद प्रयोगशाळा तंत्रज्ञ व आरोग्य सहाय्यक या कोट्यातून भरावयाचे पडत असूनही त्यासाठीही शैक्षणिक पात्रता विज्ञान पदवीधर व आरोग्य निरीक्षक अभ्यासक्रम अशी करण्यात आली आहे. जुन्या सेवाप्रवेश नियम द्वारे राज्यात कार्यरत असलेले क्षेत्र कर्मचारी, आरोग्य सेवक, आरोग्य सहाय्यक, आरोग्य पर्यवेक्षक, अवैद्यकीय अधिकारी या पदांना पदोन्नतीसाठी अशा जाचक नियमांमुळे अडचण तयार झाली आहे. तसेच आश्वासित प्रगती योजना मिळण्याचा मार्ग संपला आहे.
कोरोना काळापासून हिवताप विभागाचे कर्मचारी इतर आरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यांना बरोबर काम करीत असून शासनाने त्यांच्यावर अन्याय केला आहे असे मत जामखेड येथील हीवताप कर्मचाऱ्यांनी व्यक्त केले आहे. जुने सेवा प्रवेश नियम रद्द झाल्यानंतर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी हीवताप कर्मचाऱ्यांनी पहील्या व दुसर्‍या अशा दोन टप्प्यात सहसंचालक कार्यालय पुणे या ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. तरी देखील अजूनही शासनाने दखल घेतलेली नाही. त्यामुळे जामखेड येथील हीवताप संघटनेचे जामखेड तालुका अध्यक्ष मुबारक शेख, बी. व्ही गर्जे, बी.पी. डोके, व्ही.एस. वस्तारे, एस् .एन् .गर्जे, एल. आर. ठोसर, पी. आर. आगे, आर.आर. बांगर, व्ही.बी. शिंदे, व्ही. एस्. घंटे, एम.बी. पाचरे, एल.टी. जेधे, एन्. एस्. खाडे, एन.ए. वनवे, सी.बी. वनवे सह आदी हीवताप कर्मचाऱ्यांनी १४ डिसेंबर पासून जामखेड येथील आरोग्य विभागाच्या कार्यलया समोर काम बंद आंदोलन सुरु केले आहे. या आंदोलनामध्ये अद्याप तोडगा निघाला नसल्याने हे आंदोलन दुसर्‍या दिवशीही सुरुच राहीले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here