जामखेड न्युज – – – –
कर्जत नगरपंचायत निवडणुक प्रक्रिया सुरु झाल्यापासून अर्जदाखल प्रक्रिया प्रशासनाने व्यवस्थित हाताळली होती. मात्र सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी मोठ्या घडामोडी घडल्या. प्रभाग क्रमांक दोन
मधील भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार नीता कचरे ह्या दुपारी दोनच्या सुमारास उमेदवारी अर्ज माघार घेण्यासाठी आले असता भाजपाच्या स्थानिक नेत्यांनी त्यास जोरदार आक्षेपघेतला.
विद्यमान लोकप्रतिनिधी यांनी आपल्या यंत्रणेचा वापर करीत दबाव, दहशतीसह आर्थिक आमिष दाखवत सदर उमेदवारांवर दडपण आणून उमेदवारी अर्जमाघार घेण्यास भाग पाडले.यावेळी माजीमंत्री राम शिंदे कर्जत नगरपंचायत कार्यलयात आले असता त्यांनी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. अजित थोरबोले आणि सहायक अधिकारी गोविंद
जाधव यांना चांगलेच धारेवर धरले. लोकशाही पद्धतीने निवडणूक पार पाडावी अशी मागणी केली त्यानंतर त्यांनी प्रशासन आणि विद्यमान लोकप्रतिनिधीच्या दडपशाहीचा निषेध करत ग्रामदैवत संत श्रीगोदड महाराज यांच्या
मंदिरासमोर मौनव्रत घेत ठिय्या आंदोलन सुरू केले
शेवटचे वृत्त हाती येईपर्यंत माजी मंत्री राम शिंदे
यांचे ठिय्या आंदोलन गोदड महाराज मंदिरासमोर सुरू आहे.रात्रीचे बारा वाजून गेले तरी गोदड महाराज मंदिरासमोर राम शिंदे सह समर्थक कार्यकर्त्यांचे अंदोलन सुरू होते. राम शिंदे यांचा आजचा मुक्काम गोदड महाराजांच्या दरबारातच होणार हे आता स्पष्ट आहे. कुठल्याही निवडणूक काळात अश्याप्रकारे अंदोलन होण्याची ही पहिलीच वेळ असल्याने शिंदेंनी हाती घेतलेल्या आंदोलनाचे पडसाद काय उमटणार याकडे आता
सर्वांचेच लक्ष लागले आहे.
.