आमदार रोहित पवारांच्या दडपशाही विरोधात कर्जत मध्ये आज भाजपचा मुकमोर्चा

0
242
जामखेड न्युज – – – 
कर्जत नगरपंचायत निवडणुकीत काल सोमवारी उमेदवारी मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी ऐनवेळी भाजपचे नीता कचरे आणि राखी शहा यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्याने ही अर्ज माघारी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आ.रोहित पवार यांच्या धाक-दडपशाहीतुन झाल्याचा आरोप करत निषेध म्हणून भाजपचे माजीमंत्री राम शिंदे यांनी मौंन आंदोलन सुरू केले आहे. रोहित पवार हे पदाचा वापर करत उमेदवारांवर दबाव आणून निवडणूक प्रशासनावर दडपण आणत आहेत. याचा निषेध म्हणून आज मंगळवारी भाजपने कर्जत तहसील कार्यालयावर मूक मोर्च्याचे आयोजन केले असल्याची माहिती भाजप जिल्हा सरचिटणीस सचिन पोटरे यांनी दिली आहे.
प्रभाग दोन मधून भाजपच्या नीता कचरे आणि प्रभाग तेरा मधून भाजपचे शहर अध्यक्ष वैभव शहा यांच्या पत्नी माजी नगरसेविका राखी शहा यांनी आपली उमेदवारी मागे घेतल्याने हा भाजपला मोठा धक्का बसला आहे. प्रभाग दोन मध्ये आता फक्त राष्ट्रवादीच्या  महिला उमेदवार लंकाबाई खरात यांचा उमेदवारी अर्ज राहिल्याने त्या बिनविरोध निवडून येत आहेत, मात्र याबाबत न्यायालयात धाव घेतल्याने निकाल घोषित नाही.
आ.रोहित पवार यांच्यावर दडपशाहीचा आरोपा नंतर आ.पवार यांनी आरोप फेटाळले आहेत. येथील जनता भाजपला वैतागली आहे, त्यातून उमेदवारांना अंदाज आल्याने त्यांनी आपली उमेदवारी माघे घेतली आहे. त्यामुळे भाजपने आत्मपरीक्षण करावेत असा उपरोधिक सल्ला दिला आहे. काल उमेदवारी माघारी नंतर लंकाबाई खरात यांचा एकमेव अर्ज राहिल्याने राष्ट्रवादी वर्तुळात विजयी माहोल तयार झाला, यावेळी राष्ट्रवादी च्या कार्यकर्त्यांनी गुलाल उधळत विजय साजरा केला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here