जामखेड न्युज – – – –
रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व भारताचे माजी केंद्रीय कृषिमंत्री मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या ८१ व्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात अध्यक्षस्थानी बोलताना रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय सल्लागार समितीचे सदस्य श्री पांडुरंग(काका) सोले पा.म्हणाले की आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांसारखा नेता महाराष्ट्राला मिळाला हे आपले फार मोठे भाग्य आहे,पवार साहेब म्हणजे रयतेचे जाणता राजा होत.
अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयात रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष मा.खासदार शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमाची सुरुवात स्वागतगीत व रयतगीताने झाली. स्थानिक स्कूल कमिटी सदस्य श्री बापुमामा गदादे यांनी श्री पांडुरंग सोले पाटील यांनी अध्यक्षपद स्वीकारावे अशी अध्यक्षीय सुचना मांडली, त्या सुचनेस विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कोल्हे यांनी सर्वांनुमते अनुमोदन दिले.
रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील व लक्ष्मीबाई पाटील यांच्या प्रतीमेचे पुजन अध्यक्ष व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले.तर प्राचार्य श्री रमेश वराट सरांनी प्रास्ताविक केले.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जामखेड तालुकाध्यक्ष श्री. दत्तात्रय वारे,पं.स.सभापती सूर्यकांतनाना मोरे ,युवक अध्यक्ष श्री शरद शिंदे ,माजी जिल्हा परिषद सदस्य श्री. विश्वनाथ राऊत हे प्रमुख पाहुणे तसेच कार्यक्रमासाठी गावातील व पंचक्रोशीतील संस्था हितचिंतक व विद्यालयावर प्रेम करणारे ग्रामस्थ ,माजी विद्यार्थी उपस्थित होते.
सुत्रसंचालक श्री दिपक तुपेरे व श्री प्रमोद कारखिले यांनी प्राचार्य, पर्यवेक्षक व जेष्ठ शिक्षकांच्या हस्ते उपस्थित सर्व पाहुण्यांचे स्वागत व सत्कार केला.तसेच राष्ट्रवादी काँग्रेस सांस्कृतीक विभागाच्या जामखेड तालुकाध्यक्ष पदी निवड झाल्याबद्दल श्री दिपक तुपेरे सर व दिव्यांग सेलचे श्री बाबुराव भोसले यांचा प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
वक्तृत्व स्पर्धेतील यशस्वी विद्यार्थ्यांनी त्यांचे विचार व्यक्त केले.
निबंध,वक्तृत्व व रांगोळी स्पर्धेच्या विजेत्या विद्यार्थ्यांना विद्यालयातर्फे पाहुण्यांच्या हस्ते पारितोषिके देऊन सन्मानित करण्यात आले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष श्री दत्तात्रय वारे,पं.स.सभापती श्री. सूर्यकांतनाना मोरे, माजी जि.प.सदस्य श्री विश्वनाथ राऊत,पाटोदा गावचे सरपंच श्री पठाण ,अरणगावचे युवा कार्यकर्ते श्री रणजित कारंडे व प्रमुख पाहुण्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमासाठी विद्यालयाचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी तसेच श्री संतोषकाका निगुडे,श्री शरद गदादे यांचे सहकार्य लाभले. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी सर्व विद्यार्थ्यांना खाऊचे वाटप करून पक्षाध्यक्ष आदरणीय खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांचा ८१ वा वाढदिवस साजरा केला.
अध्यक्षीय भाषणानंतर स्थानिक स्कूल कमिटीचे श्री. राजेंद्रभाऊ नन्नवरे यांनी सर्व पाहुण्यांचे मनःपूर्वक आभार मानले.