Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या श्री अरण्येश्वर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

श्री अरण्येश्वर विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

0
306
जामखेड प्रतिनिधी 
               जामखेड न्युज – – – 
 भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. भिमराव आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन 6 डिसेंबर 2021 रोजी अरणगाव येथील श्री अरण्येश्वर विद्यालयात आयोजित करण्यात आला.
      “शिका,संघटीत व्हा,संघर्ष करा “या बाबासाहेबांनी दिलेल्या संदेशाची आठवण विद्यार्थ्यांना कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. कैलास बिरंगळ यांनी दिली, ते पुढे म्हणाले की विद्यार्थी अवस्थेत असताना विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, शिक्षणाने माणूस वैचारिक पातळीवर संघटन करून संघर्षाची तयारी करु शकतो, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धेविरुद्ध यशस्वी लढा देऊ शकतो, परंतु योग्य शिक्षण नसेल तर वैचारिक पातळीवर माणूस अयशस्वी होतो, त्यामुळे  प्रतिकूल परस्थिती असताना आंबेडकरांनी केलेला अभ्यास व शिक्षणासाठी वेळेचा केलेला योग्य वापर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श अंगीकार करणे आवश्यक आहे असे मत श्री बिरंगळ यांनी व्यक्त केले.
     महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात प्रारंभी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला कार्यक्रमाचे अध्यक्ष कैलास बिरंगळ, विद्यालयाचे पर्यवेक्षक श्री हरिभाऊ कोल्हे,श्री अरुणकुमार पिंपळे,श्री दिपक तुपेरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.
     श्री कोल्हे सरांनी अध्यक्षीय सुचना मांडली तर श्री.अ.हमीद तांबोळी यांनी अनुमोदन दिले.
              विशाल पवळ या विद्यार्थ्याने डॉ आंबेडकर यांचा संपूर्ण जीवनपट व त्यांचे कार्य स्पष्ट केले. तर श्री गोकुळ गंधे,श्री प्रमोद कारखेले,श्री,दत्ता कसबे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेल्या शैक्षणिक, सामाजिक, राजकीय कार्याचा परिचय विद्यार्थ्यांना दिला व महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ आंबेडकर यांना अभिवादन केले.
       श्री. अरुणकुमार पिंगळे यांनी उपस्थितांचे आभार व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!