श्री बन्सीभाऊ म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा

0
252
जामखेड न्युज – – – 

शिका, संघटीत व्हा, संघर्ष करा  विद्यार्थ्यांनी शिक्षणावर लक्ष केंद्रित केले पाहिजे, शिक्षणाने माणूस वैचारिक पातळीवर संघटन करून संघर्षाची तयारी करु शकतो, अन्याय, अत्याचार, अंधश्रद्धेविरुद्ध यशस्वी लढा देऊ शकतो, परंतु योग्य शिक्षण नसेल तर वैचारिक पातळीवर माणूस अयशस्वी होतो, त्यामुळे  प्रतिकूल परस्थिती असताना आंबेडकरांनी केलेला अभ्यास व शिक्षणासाठी वेळेचा केलेला योग्य वापर लक्षात घेऊन विद्यार्थ्यांनी त्यांचा आदर्श अंगीकार करणे आवश्यक आहे असे मत श्री रमेश घोडेस्वार यांनी महापरिनिर्वाण दिनानिमित्त व्यक्त केले.


      श्री बन्सीभाऊ म्हस्के माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात आज डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिनानिमित्त अभिवादन सभा आयोजित करण्यात आली होती या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य कुमार म्हस्के होते.
यावेळी प्राचार्य व सर्व शिक्षकांच्या हस्ते प्रतिमा पुजन करण्यात आले.
 यावेळी अनेक विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्याविषयी माहिती सांगितली.
     विद्यालयातील शिक्षक रमेश घोडेस्वार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याची सविस्तर माहिती दिली व विद्यार्थ्यांनी कितीही अडचणी आल्या तरी शिक्षणात खंड पडू देता कामा नये असे सांगितले व बाबासाहेबांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
      सर्वांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ढगे हरिश्चंद्र तर आभार जीवडे सर यांनी मानले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here