जामखेड पोलीसांची धडाकेबाज कारवाई – गंभीर गुन्ह्यातील फरार आरोपी अटकेत

0
327
जामखेड प्रतिनिधी 
          जामखेड न्युज – – – 
गेल्या दोन वर्षांपासून गंभीर दरोडे, तसेच इतर गंभीर
गुन्ह्यातील फरार असलेले आरोपी  जामखेड पोलीसांनी कोंबिंग आॅपरेशन राबवत पोतेवाडी शिवारात पहाटे दोन्ही आरोपींना पकडले यामुळे जामखेड पोलीसांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
आज दि 01/12/ 2021 चे पहाटे 5/00 वा दरम्यान जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत चोभेवाडी, पोतेवाडी  शिवारात  गुन्हेगार वस्तीवर कोंबिंग ऑपरेशन केले.कोंबिंग ऑपरेशन दरम्यान फरार असणारे आरोपी पकडण्यात आले त्यांचे नाव व गुन्हा रजिस्टर नंबर पुढीलप्रमाणे आहे.
1)जामखेड पो. स्टे. गु. रजि. नं.135/2019 भादवि कलम 395 मधील फरार आरोपी नामे नितीन चंदन काळे रा पोतेवाडी ता जामखेड
2)जामखेड पो. स्टे. गु. रजि. नं. 57/2019 भादवि कलम 354 ,143 ,147 अ. जा.ज.कलम यामधील फरार आरोपी नामे गणेश उर्फ बंडू नामदेव सगळे रा पोतेवाडी ता जामखेड या दोघांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशन ला आणून पुढील कार्यवाही करीत आहोत.
    सदरची कारवाई-
मा.पोलीस अधिक्षक सो श्री.मनोज पाटील अहमदनगर जिल्हा, अपर पोलीस अधिक्षक श्री सौरभकुमार अग्रवाल, उप विभागीय पोलीस अधिकारी कर्जत भाग श्री आण्णासाहेब जाधव
 यांच्या मार्गदर्शनाखाली-
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड,  पोलीस उप निरीक्षक राजू थोरात, पोलीस अंमलदार अविनाश ढेरे, आबासाहेब आवारे, विजयकुमार कोळी ,अरुण पवार महिला पोलीस कॉन्स्टेबल सारिका धनवडे आदींनी केली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here