आगामी निवडणुका एकतर्फी जिंकण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस सज्ज – मोठ्या प्रमाणावर इनकमिंग

0
323
जामखेड प्रतिनिधी 
           जामखेड न्युज – – – 
 आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषद,
सेवा सोसायट्या, बाजार समिती या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून राष्ट्रवादी काँग्रेसने मोठ्या प्रमाणावर इनकमिंग मोहिमेचा शुभारंभ दि. ३० रोजी तालुक्यातील नान्नज येथे केले यात अनेक गावचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य, सेवा संस्थेचे सदस्य यांनी भाजपाची साथ सोडत राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला आहे.
      राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने तालुक्यातील नान्नज पक्ष प्रवेश सोहळ्याचे आयोजन राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपालीताई चाकणकर व आमदार रोहित पवारांच्या उपस्थितीत करण्यात आले होते यात अनेकांनी भाजपाची साथ सोडून राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केला.
युवा नेते प्रशांत शिंदे  यांचा राष्ट्रवादीत प्रवेश कधी होणार याकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. कारण अनेकदा प्रशांत
शिंदे यांच्या पक्ष प्रवेशाचा मुहूर्त टळला होता. मात्र मंगळवारी पक्ष प्रवेशाचा योग जुळून आला आणि प्रशांत शिंदे व त्यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत राष्ट्रवादीत प्रवेश केला.
 प्रशांत शिंदे व त्यांचे समर्थक राष्ट्रवादीत डेरेदाखल
झाल्याने जवळा जिल्हा परिषद गटातील राजकीय
समीकरणे बदलले आहेत. युवा नेते प्रशांत शिंदे यांच्यासह जवळ्याच्या सरपंच वैशाली सुभाष शिंदे, उपसरपंच रोहिणी
काकासाहेब वाळूजकर, काकासाहेब वाळूजकर, सावता ग्रुप अध्यक्ष प्रमोद कोल्हे
 वंजारवाडीचे भाजपा नेते रामकिसन जायभाय
 कवडगावचे सरपंच सीताराम कांबळे
सावरगावचे सरपंच काकासाहेब चव्हाण, चेअरमन दादासाहेब ढवळे, उपसरपंच सचिन ढवळे, माजी सरपंच अनिल माने, महादेव फाळके, दादासाहेब थोरात
आदी कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.
राष्ट्रवादीत प्रवेश केलेले बहुतांश जण भाजपचे कार्यकर्ते आहेत. प्रशांत शिंदे यांनी आपल्या समर्थकांसह जोरदार शक्तिप्रदर्शन करीत राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर आक्रमकपणे सक्रीय झाला आहे.
येणाऱ्या सर्व निवडणूका एकहाती जिंकण्याचे व्यूहरचना राष्ट्रवादीने आखल्याचे दिसत आहे. राष्ट्रवादीने हाती घेतलेल्या इनकमिंग मोहिमेचा सर्वाधिक फटका भाजपला बसताना दिसत आहे. भाजपमधून सुरू झालेली गळती रोखण्यासाठी भाजपला तातडीने पाऊले उचलावी लागतील. अन्यथा अगामी काळात भाजपला मोठे भगदाड
पडण्याचा धोका आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here