जामखेड प्रतिनिधी
आज 28 रोजी नगर जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार डॉ. सुजयदादा विखे पाटिल यांच्या वाढदिवसानिमित्त वक्तृत्व स्पर्धा आयोजित केल्या होत्या या वक्तृत्व स्पर्धेकरिता जामखेड तसेच ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
स्पर्धेचे उद्घाटन जिल्हा बँकेचे संचालक मा.श्री.अमोल राळेभात यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करुण करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रस्ताविक भाजपा यु.मो. तालुकाध्यक्ष पै.शरद कार्ले यांनी केले. जवळपास 35 विद्यार्थ्यांनी स्पर्धेमध्ये सहभाग नोंदवला.
ADVERTISEMENT

1 सहकारातून समृद्धीकडे
2 आजचा तरुण व राजकारण
3 शेतकरी आत्महत्या
4 स्री सशक्तीकरण
हे विषय स्पर्धेत ठेवण्यात आले होते
पुढीलप्रमाणे बक्षिसे देण्यात आली होती
प्रथम पारितोषिक: 7777/-
द्वितीय पारितोषिक: 5555/-
तृतीय पारितोषिक: 3333/-
चतुर्थ पारितोषिक: 2222/-
उत्तेजनार्थ पारितोषिक: 1111/-
खालिल प्रमाणे स्पर्धकांनी बक्षिसे जिंकली
१)शिवगंगा मत्रे पहीला
२)महेश दहीकर दुसरा
३)सार्थक गर्जे तिसरा
४)शितल मते चौथा
५)अंकिता पोकळे पाचवा
परिक्षक:-श्री भोंडवे संतोष,श्री हजारे अमोल,श्री सोळंके खंडेराव,श्री चेटमपल्ले सुसेन
आयोजक: मा.पै. शरद कार्ले (तालुका अध्यक्ष भाजपा युवा मोर्चा,जामखेड यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती.
कार्यक्रमाच्या प्रसंगी अध्यक्ष अजयदादा काशिद, मा सभापती मा डॉ. भगवानदादा मुरुमुकर, प्रदेश उपाध्यक्ष, वैजीनाथ पाटिल, प्रविन चोरडीया, नगराध्यक्ष सोमनाथ राळेभात, नगरसेवक आमितशेठ चिंतामनी, बिभिषन धनवडे, प्रा. अरुण वराट सर, काशिनाथ ओमासे, मनोज काका कुलकर्णी,अ ॅड बारगजे, युवा मोर्चा शहराध्यक्ष आभिजीत राळेभात,पाटोदा ग्रा पं सदस्य मा दिनकर टापरे, शहर उपाध्यक्ष मा शिवकुमार डोंगरे,सरचिटनीस मा आर्जुनदादा म्हेत्रे, गोरख घनवट,योगीराज राऊत,गणेश पोकळे व पालक वर्ग मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमासाठी उपस्थित राहिलेल्या सर्व मान्यवरांचे वैभव कार्ले यानी आभार मानले.