जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज – – –
ज्या मुलांनी शिष्यवृत्ती परीक्षेत यश मिळवले त्यांचा आणि त्यांच्या पालकांचा गुणगौरव करणे तसेच ज्या शिक्षकांनी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले त्यांचा सन्मान करणे ही भविष्यातील मोठ्या यशाची पायाभरणी आहे. आज जर त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली तर भविष्यात त्यांना अधिक उर्मी मिळेल. असा विश्वास गट विकास अधिकारी प्रकाश पोळ व्यक्त केला.
ADVERTISEMENT

जामखेड पंचायत समितीच्या वतीने तालुक्यातील इ.५ वी व इ.८ वी स्कॉलरशिप परीक्षेत पात्र ठरलेल्या ५५ विद्यार्थी, त्यांचे पालक व मार्गदर्शक शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. स्कॉलरशिप परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करणाऱ्या मुलांचा गुणगौरव करून त्यांच्या पंखात बळ भरण्याच उद्दात काम पंचायत समितीचे गट विकास अधिकारी प्रकाश पोळ यांच्या संकलपेतून पार पडले. यावेळी यशस्वी विद्यार्थ्यांना अभिनंदनपर प्रमाणपत्र दिल्यानंतर विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर जो आंनद दिसला तो अवर्णनीय होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंचायत समितीच्या सभापती राजश्रीताई सुर्यकांत मोरे तर प्रमुख पाहुणे म्हणून जि.प.सदस्य सोमनाथ पाचरणे, माजी सभापती व विद्यमान सदस्य डॉ.भगवानराव मुरूमकर, उपसभापती मनिषाताई रवींद्र सुरवसे, विविध विभागाचे विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक, शिक्षक, पालक व गुणवंत विद्यार्थी हजर होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर कोळेकर सर यांनी केले.