Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या लसवंतांनाच मिळणार मद्य!!!!

लसवंतांनाच मिळणार मद्य!!!!

0
242
जामखेड न्युज – – – 
कोरोना लसीचे डोस घेतले असल्यासच औरंगाबादेत  मिळणार आता दारू. या बाबत जिल्हाधिकारी चव्हाण यांनी आपल्या अधिकारात निर्णय घेतला असून औरंगाबाद जिल्हा हद्दीत कोरोना लसीकरणास मिळणाऱ्या कमी प्रतिसादांमुळे आणि राज्य शासनाने नोव्हेंबर अखेर किमान पहिला डोस शंभर टक्के पूर्ण व्हावा यासाठी अभियान राबवण्याचे दिलेले निर्देश यानुसार औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी विविध योजना राबविल्या आहेत.
                            ADVERTISEMENT
       
सध्या औरंगाबाद जिल्हाधिकारी राज्यात चर्चेत असून औरंगाबाद जिल्ह्यात  कोरोना लसीकरण पॅटर्न गाजत असून ज्या जिल्ह्यांमध्ये लसीकरणाला कमी प्रतिसाद मिळत असेल तर औरंगाबाद लसीकरण पॅटर्न राबवावा अशी एकंदरीत अपेक्षा आहे. या अनुषंगाने औरंगाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांनी पेट्रोल, गॅस, विविध खरेदी-विक्री, प्रवास, आदी ठिकाणी कोरोनाचे डोस घेतलेल्यांनाच या ठिकाणी  सेवा मिळणार असल्याचं स्पष्ट केले आहे.
ज्या ठिकाणी हे नियम पाळले जाणार नाहीत त्या ठिकाणच्या संस्थापना वर कारवाई करण्यात येत आहे. या अनुषंगाने जिल्ह्यातील एक पेट्रोल पंप जिल्हा प्रशासनाने तहसीलदारांच्या माध्यमातून सील केलेला आहे .आता िल्हाधिकार्‍यांनी लसीकरणाची मोहीम अजून विस्तारत कळीचा मुद्दा असलेल्या मद्यप्रेमिंकडे कटाक्ष टाकला आहे.  त्या अनुषंगाने यापुढे आता किरकोळ दारू खरेदी किंवा बिअर बार परमिट रूम मध्ये दारू पिण्यासाठी संबंधित ग्राहकांना कोरोनाची लस घेतली असल्याचा दाखला हा त्या परमिट रूम मध्ये अथवा किरकोळ विक्री असलेल्या वाईन शॉप मध्ये दाखवा लागणार आहे. एकंदरीत याबद्दल जिल्हाधिकाऱ्यांनी विशेष पथके नेमली असून त्याचबरोबर त्या-त्या मद्यविक्री दुकानांमध्ये सीसीटीव्ही तपासले जाणार असून या आदेशाचे पालन केले जात आहे किंवा नाही हे तपासले जाणार आहे. आदेशाचे पालन न करणाऱ्या दुकानांवर कारवाई केली जाणार आहे.
त्यामुळे आता यापुढे मध्ये प्रेमींना मद्याच्या सेवनापूर्वी जर लस घेतली नसेल तर कोरोनाची लस घ्यावी लागेल त्यानंतरच त्यांना आपली मद्याची हौस पूर्ण करता येणार आहे. औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्णयाची सध्या सर्वत्र चर्चा होत असताना कौतुकही होत आहे. त्याबद्दल निश्चितच इतर जिल्ह्यांमध्ये कशा पद्धतीने कारवाई होती आणि तेथील जिल्हाधिकारी कसे निर्णय घेतात याकडे लक्ष असणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!