जामखेड न्युज – –
तालुक्यातील 4 ग्रामपंचायतींच्या 4 रिक्त सदस्य पदांच्या पोटनिवडणुकीचा कार्यक्रम निवडणूक विभागाने जाहीर केला आहे, जवळा, सावरगाव, नायगाव येथील ग्रामपंचायत सदस्यांचे निधन झाल्याने व आघी येथील पद रिक्त राहिले होते.
ADVERTISEMENT

या कारणांनी रिक्त असणाऱ्या पदांसाठी या पोटनिवडणुका होत आहेत. दि ३० नोव्हेंबर पासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे. अर्ज भरण्याचा अंतिम दिवस ६ डिसेंबर आहे(दिनांक 4 आणि 5 डिसेंबर सुट्टीचे दिवस वगळून). ७ डिसेंबर रोजी छाननी, तर ९ डिसेंबर अर्ज माघारीचा दिवस व चिन्ह वाटप आहे. या जागांसाठी २१ डिसेंबर रोजी मतदान, तर २२ रोजी मतमोजणी होणार आहे. यामध्ये मौजे जवळा ग्रामपंचायतीच्या प्रभाग क्रमांक ५ मध्ये सर्वसाधारण जागा.
तसेच सावरगाव प्रभाग १ मध्ये अनुसूचित जाती.
नायगाव प्रभाग १ मधील सर्वसाधारण जागा.
आघी येथील प्रभाग ३ मधील अनुसूचित जाती स्त्री. प्रभागातील रिक्त सदस्याची पोटनिवडणूक घेण्यात येणार असून यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नेमणूक करण्यात आल्या आहेत. या पोटनिवडणुकीसाठी निवडणूकीचे नियोजन महसूल प्रशासनाकडून करण्यात आले आहे. संबंधित गावापुरती आचारसंहिताही निकाल लागेपर्यंत लागू राहणार आहे. अशी माहिती जामखेडचे तहसीलदार योगेश चंद्रे यांनी दिली.