जामखेड न्युज – – – –
अनेक वारकरी (Warkari) व भाविक मंडळी पंढरपुरी (Pandharpur) विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. याच भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेकडून (Indian Railway) येत्या 14 नोव्हेंबरपासून खास ट्रेनच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. आदिलाबाद (Adilabad) येथून रविवारी ता. 14 नोव्हेंबरला दुपारी दोन वाजता पंढरपूरकडे गाडी मार्गस्थ होईल आणि सोमवारी सकाळी 8 वाजता पंढरपूरला पोचणार आहे.
ADVERTISEMENT 

सोमवारी (15 नोव्हेंबर) रोजी महाराष्ट्रात कार्तिकी एकादशीचा उत्सव रंगणार आहे. यानिमित्ताने अनेक वारकरी व भाविक मंडळी पंढरपुरी विठुरायाचे दर्शन घेण्यासाठी जात असतात. या भाविकांच्या सोयीसाठी रेल्वेकडून 14 नोव्हेंबरपासून खास रेल्वेच्या फेऱ्या सुरू करण्यात आल्या आहेत. आदिलाबाद येथून 14 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 वाजता गाडी सुटणार आहे आणि सोमवारी सकाळी 8 वाजता पंढरपूरला पोचणार असल्याची माहिती नुकतीच रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. या गाडीला स्लीपर, वातानुकूलित, सर्वसाधारण असे 20 डबे असणार आहेत. यंदा आपणही एकादशीच्या निमित्ताने पंढरपूर वारी करू इच्छित असाल तर संबंधित गाड्यांचे वेळापत्रक आपल्याला नक्की कामी येईल.
ADVERTISEMENT

रविवारी ता. 14 नोव्हेंबर रोजी गाडी (क्रमांक 07501) आदिलाबाद येथून दुपारी 2 वाजता सुटेल. नांदेड येथे रात्री 6 वाजून 20 मिनिटांनी पोचेल तर कुर्डुवाडी येथे सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी पोचेल. किनवट, बोधडी बुर्ग, धानोरा ( डेक्कन), सहस्रकुंड, हिमयंतनागर, हदगाव रोड, भोकर, मुदखेड, नांदेड, पूर्णा, परभणी, गंगाखेर, परळी वैजनाथ, घाटनांदूर, लातूर रोड, लातूर, उस्मानाबाद, बार्शी टाऊन, कुर्डुवाडी मार्गे पंढरपूरला सोमवारी सकाळी 8 वाजता पोचेल. गाडी क्रमांक 07503 नांदेड-पंढरपूर-आदिलाबाद ही गाडी नांदेड येथून 18 नोव्हेंबरला सायंकाळी 6.20 वाजता सुटणार आहे आणि 19 नोव्हेंबरला सकाळी 8 वाजता पंढरपूरला पोचेल.
महाराष्ट्राच्या विविध भागांतून भाविक कार्तिकी वारीसाठी पंढरपूरला येत असतात. वारीसाठी येणाऱ्या भाविकांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी रेल्वे सुरू करण्यात आल्याने सोय झाली आहे. त्यामुळे प्रवाशांना यंदाच्या वर्षी कार्तिकी वारीसाठी रेल्वेने प्रवास करता येणार आहे.- श्यामसुंदर मानधना, लातूर, विभागीय रेल्वे सल्लागार समिती सदस्य, मध्य रेल्वे मुंबई