जामखेड न्युज – – –
येथील जिल्हा सामान्य रुग्णालयातील कोरोना रुग्णांसाठी असलेल्या अतिदक्षता विभागाला लागलेल्या आगीत शनिवारी अकरा रुग्णांचा दुर्दवी मृत्यू झाला तर सहारुग्णांना वाचवण्यात यश आले. या दुर्घटनेनंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात राज्य आणि केंद्र सरकारमधील मंत्री, स्थानिक खासदार,आमदार, विविध पक्षाचे नेते यांनी घटनास्थळी येत पाहणी केली.
ADVERTISEMENT 

दुर्घटनेची राज्य आणि केंद्र सरकार चौकशी करणार-
-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या दुर्घटनेच्या चौकशीचे आदेश दिले आहे. ही चौकशी नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे यांच्या अध्यक्षतेखाली होईल. त्याच बरोबर केंद्र सरकारच्या वतीनेही चौकशी होणार असून त्याचा अहवाल केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मालवीय यांना देण्यात येणार असल्याचे केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भरती पवार यांनी जिल्हा रुग्णालयाला भेट दिल्या नंतर स्पष्ट केले आहे, तसेच स्थानिक तोफखाना पोलीस ठाण्यात याबाबत आईपीसी 304-अ नुसार अज्ञातानं विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस त्यादृष्टीने तपास करणार आहे.
ADVERTISEMENT 

बहुतांशी रुग्ण वयोवृद्ध-
-काल शनिवारी जिल्हा रुग्णालयाच्या आयसीयू विभागाला अचानक आग लागून संपूर्ण वार्डात मोठा धूर पसरला. यावेळी या आयसीयू सतरा कोरोना रुग्ण उपचार घेत होते,यातील अनेकांना ऑक्सिजन, व्हेंटिलेटर लावण्यात आले होते, एक रुग्ण वगळता इतर सोळा रुग्ण हे पन्नास-साथ वर्षांवरील होते. यातील चार महिला तर सात पुरुष रुग्णांचा दुर्दैवाने मृत्यू झाला. मृतात एका व्यक्तीची ओळख पटलेली नाही. दहा जणांचे मृत्यू हे धूर आणि सफोकेशन मुळे झाले आहेत तर एकाच आगीत जळल्याने झाला आहे. मृत्यू झालेल्यांच्या जवळच्या नातेवाईकांना पाच लाखांची मदत मुख्यमंत्री ठाकरे यांनी घोषित केली आहे.
ADVERTISEMENT 

दिवसभर मंत्र्यांचा पाहणी दौरा-
-दुर्घटनेनंतर अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार, राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खा.सदाशिव लोखंडे,खा.सुजय विखे, स्थानिक आमदार संग्राम जगताप आदींनी भेट दिली. नाशिक परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक पांडे यांनी घटनास्थळी येत पोलिसांना गुन्हा दाखल करून चौकशीचे आदेश दिले आहेत.

विभागीय आयुक्त गमे करणार चौकशी-
पालकमंत्री मुश्रीफ, जयंत पाटील यांनी दुर्घटनेची विभागीय आयुक्तांची समिती सखोल चौकशी करून अहवाल देणार आहे. चौकशीत जेही दोषी असतील त्यांच्यावर कडक कारवाई केली जाईल असे स्पष्टीकरण माध्यमांना दिले. ही चौकशी तातडीने पूर्ण करण्याचे आदेश देण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
आज पवार भेट देण्याची शक्यता-
-आज जिल्हा रुग्णालयास खा.शरद पवार,उपमुख्यमंत्री अजित पवार आदी भेट देणार असल्याची माहिती आहे. विरोधी पक्षाचे नेतेतही भेट देणार आहेत.