नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुलांना कपडे आणि फराळाचे वाटप – स्व. मंगेश कैलास आरसुळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दिवाळी भेट

0
204
जामखेड प्रतिनिधी
                जामखेड न्युज – – – – 
       श्री संत वामनभाऊ सामाजिक संस्था संचलित साकत फाटा, बीड रोड जामखेड येथील नवज्योत प्रकल्पातील वयोवृद्ध व मुलांना स्व. मंगेश कैलास आरसुळ यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ दिपावली निमित्त नवीन कपडे व फराळाचे आरसुळ कुटुंबाच्या वतीने कैलास रणजित आरसुळ यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष रघुनाथ मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली वाटप करण्यात आले.
                   ADVERTISEMENT
          या कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून काकासाहेब नेटके एन. के. ट्रेडर्स, पत्रकार अशोक निमोणकर, तक्षशिला काँलेजचे संस्थापक अध्यक्ष संजय कदम, मनसेचे तालुकाध्यक्ष प्रदिप टापरे, उद्योजक दिपक कदम, अमितशेठ गंभीर, गुरूकुल मंडळाचे तालुकाध्यक्ष विजय जाधव सर, आदी मान्यवर उपस्थित होते.
                  ADVERTISEMENT
      प्रदिप टापरे यांनी बोलताना सांगितले की, आरसुळ कुटुंबाने घरातील दुःख विसरून मुलाच्या पुण्यस्मरणार्थ गोरगरीब वयोवृद्ध व मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणुन आगळीवेगळी दिवाळी साजरी केली, त्याबद्दल त्यांचे विशेष आभार मानले व पुढील काळात या प्रकल्पाला आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
     अशोक निमोणकर यांनी बोलताना सांगितले की, जामखेड तालुक्यात वयोवृद्धांसाठी वृद्धाश्रम सुरु करून नवज्योत प्रकल्पाची निर्मिती झाली असून याठिकाणी गोरगरिबांना आश्रय उपलब्ध करून दिला असून आरसुळ कुटुंबाचा आदर्श घेऊन तालुक्यातील दानशूर व्यक्तींनी आपल्या घासातील देऊन या प्रकल्पाला मदत करण्याचे आवाहन केले व जामखेड पत्रकार संघाच्या वतीने आवश्यक ती मदत करण्याचे आश्वासन दिले.
       संजय कदम, अमित गंभीर, विजय जाधव यांनी स्व. मंगेश आरसुळ याला श्रद्धांजली वाहत मनोगत व्यक्त करताना आरसुळ कुटुंबाचे कौतुक केले व उपस्थित मान्यवरांना प्रकल्पास मदत करण्याचे आवाहन केले.
         यावेळी या कार्यक्रमास बाजीराव आरसूळ, चिंतामणी सगरे, पंचफुला आरसूळ, सारिका आरसूळ, उमेश आरसूळ, योगेश आरसुळ, माऊली राळेभात, पोलीस सतीश शिंदे, मेजर विजय गर्जे, पत्रकार धनराज पवार, अजय अवसरे, मोहन पवार, किशोर सांगळे, पप्पू वर्मा आदींसह नवज्योत प्रकल्पातील वृद्ध व मुले उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here