Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव जामखेड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

जामखेड तालुक्यात बर्ड फ्लूचा शिरकाव जामखेड तालुक्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

0
367
जामखेड प्रतिनिधी
    जामखेड तालुक्याच्या शेजारी असणार्‍या मुगगाव येथील कावळ्यांचा मृत्यू काही दिवसांपूर्वी बर्ड फ्लूने झाला होता आता जामखेड मधेही कोरोनाचा शिरकाव झाल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कोरोना बरोबर आता बर्ड फ्लूचे संकट उभे राहिले आहे. त्यामुळे तालुक्यातील नागरीकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
    तालुक्यातील रेडेवाडी येथील कावळ्याचा बर्ड फ्लू  रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. अशी माहिती तहसीलदार विशाल नाईकवाडे व पंचायत समितीचे पशुधन विकास अधिकारी डॉ ए. एस. गवारे यांनी दिली आहे.
गेल्या अकरा महीन्यांपासून संपुर्ण देश कोरोना अजाराशी लढत आसतानाच आज आपल्या देशात कोरोना लसीकरणाला सुरवात झाली आहे. मात्र दुसरीकडे कोरोना साथ आसतानाच तालुक्यातील रेडेवाडी येथील मृत कावळ्याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आढळून आला आहे.
जामखेड पासून चार किलोमीटर अंतरावर जामखेड – बीड रोडवरील रेडेवाडी फाट्याजवळ दि. १२ जानेवारी रोजी दुपारी एक कावळा व कोकिळा अशा दोन पक्षांचा मृत्यू झाला होता. या बाबत ची माहीती सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना मिळाली होती. यांनी घटनास्थळी जाऊन प्रत्यक्ष पहाणी करुन सदरची माहिती
वनविभागाचे अधिकारी व पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. ए. एस. गवारे यांना दिली होती.
या नंतर पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गवारे यांनी या दोन्ही पक्षांचे स्वबचे नमुने तपासणीसाठी पुणे येथील विभागीय प्रयोग शाळेत तपासणीसाठी पाठवले होते. त्या मध्ये मृत पावलेल्या कावळ्याचा रिपोर्ट चार दिवसांनी म्हणजे आज दि. १६ जानेवारी रोजी पॉझिटिव्ह आढळून आला आहे. त्यामुळे नागरिकांबरोबरच पोल्ट्री व्यावसायिकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. तसेच तालुक्यात ज्या ठिकाणी पक्षी असतील त्या ठिकाणी प्रत्यक्ष भेटी देणे सुरू आहे. ज्या ठिकाणी पॉल्ट्री फॉर्म आहेत तो परीसर सॅनिटायझर करण्याचे आदेश संबंधित पक्षी मालकांना दिले आहेत. अशी माहिती पंचायत समितीचे पशुवैद्यकीय अधिकारी डॉ ए. एस. गवारे
यांनी दिली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!