जामखेड प्रतिनिधी
जामखेड न्युज
अनेक गुन्ह्य़ात फरार असलेला पोलीसांना हवा असलेला खांडवी येथील आरोपी मतदानासाठी येणार असल्याची गुप्त माहिती जामखेड पोलीसांना मिळाली पोलीसांनी गुप्तपणे सापळा रचून आरोपी मतदान करून बाहेर आला कि लगेच पोलीसांनी झडप घालून आरोपीस अटक केली.
या कामगिरीमुळे उपविभागीय अधिकारी यांनी जामखेड पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
ग्रामपंचायत निवडणुक 2021 मध्ये मतदान करण्यासाठी खांडवी गावातील फरार आरोपी-नामे शरद गुलबाशा भोसले रा.खांडवी ता.जामखेड हा मतदान करण्यासाठी येणार आहे.अशी खात्रीशीर बातमी पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांना मिळाल्याने त्यांनी लगेच खांडवी बुथवर ड्युटी करणारे पोलीस अंमलदार पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास गुंडाळे, अरुण पोटे तसेच खांडवी गावातील पोलीस पाटील संतोष बापुराव डिसले, डी.बी.पथकातील साहाय्यक पोलिस निरीक्षक महेश जानकर, पोलिस कॉन्स्टेबल संग्राम जाधव, आबासाहेब आवारे, संदिप राऊत, अरूण पवार यांना सदर मिळालेल्या बातमीतील आरोपी शरद भोसले यास ताब्यात घेण्यासाठी कळवले होते. आरोपी नामे शरद गुलबाशा भोसले हा मतदान केंद्रात जावुन मतदान करून बाहेर आल्यानंतर त्याला काही समजायच्या आत त्याचेवर झडप घालुन जागीच पकडण्यात आले.नमुद आरोपी विरूद्ध जामखेड पोलीस स्टेशन ला गु.र.नं. 743/2020 भा.द.वि कलम 307,504,506 प्रमाणे गुन्हयात फरार होता.त्याचेवर याअगोदर जामखेड पोलीस स्टेशनला यापुर्वीही भादवि कलम -302,307 ,354 सारखे गंभिर गुन्हे दाखल असुन तो जामिनावर सुटलेला आहे.या गुन्हयात आरोपी पकडण्यासाठी पोलीस पाटील संतोष डिसले यांनी खास मदत केली असल्याने त्यांचे
उपविभागीय पोलीस अधिकारी आण्णासाहेब जाधव यांनी
जामखेड पोलीसांचे अभिनंदन केले आहे.
पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांनी सांगितले की अशा प्रकारे प्रत्येकाने आपली जबाबदारी समजुन पोलीसांना सहकार्य केल्यास गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांवर आळा बसण्यास मदत होईल.